अकरावीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी असे विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २०२५ मध्ये इंजिनीअरिंग आणि मेडिकल शाखांना प्रवेश घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार आहे. या प्रवेश परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे. याबाबत विद्यार्थी आणि पालकांना सखोल मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने LearnAc (लर्नएसी) या संस्थेने ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सहकार्याने ‘११ वी सायन्सला जाताना’ या विषयावर येत्या रविवारी मोफत मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. या सत्रात संस्थेचे संचालक डॉ. निनाद शेवडे मार्गदर्शन करणार आहेत.
अकरावी आणि बारावीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या सर्व विषयांचा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके व मूल्यमापन पद्धती आदी ‘एनसीईआरटी’ने ठरवलेल्या धोरणाप्रमाणे आहेत. याला अनुसरून २०२५मध्ये प्रवेश परीक्षा होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये अकरावी सायन्सचे सर्वसाधारण स्वरूप, अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची माहिती यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे जेईई, नीट यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी कशी तयारी करावी, याची माहितीही विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे. अकरावीसाठी योग्य विषय आणि कॉलेज कसे निवडावे; तसेच अकरावीतच अभ्यासाची सुरुवात का करावी, याबद्दलचे मार्गदर्शनदेखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये काठिण्यपातळीत खूप मोठा फरक आहे. शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाल्यामुळे, विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जाणार आहे. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काय करावे, याची माहिती दिली जाणार आहे. मुलांना अभ्यासाचे दडपण येऊ नये यासाठी समुपदेशनाचे महत्त्व सांगितले जाईल. त्यामुळे इयत्ता अकरावीत सायन्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व पालक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ७७७५९३२२५५ / ७०५८६६८२१० या मोबाइल क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. शेवडे यांनी केले आहे.
तारीख – रविवार २३ एप्रिल
वेळ – सकाळी १०.३०
स्थळ – असेम्ब्ली हॉल, आबासाहेब गरवारे कॉलेज, कर्वे रस्ता