हे ६० मोबाइल ॲप्स धोकादायक, फोनमधून तात्काळ डिलीट करा, पाहा लिस्ट

नवी दिल्लीःअँड्रॉयड फोनमध्ये मेलवेयर किंवा व्हायरस नेहमी राहतात. या ॲप्सवरून तक्रार सुद्धा येत असतात. गुगल आपल्या प्ले स्टोरवरून या ॲप्सला डिलीट करते. आता ६० अशा ॲप्सची ओळख पटली आहे. ज्यात मेलवेयर आहेत. १०० मिलियन म्हणजेच १० कोटी हून जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. गुगल प्ले स्टोर शिवाय, या मेलवेयरच्या ॲप्सला दक्षिण कोरियात ८ मिलियन म्हणजेच ८० लाख यूजर्सनी वन स्टोरवरून डाउनलोड केले आहे. या ६० अँड्रॉयड ॲप्समध्ये मेलवेयरची ओळख McAfee मोबाइल रिसर्चने केली आहे. या ॲप्समध्ये उपलब्ध मेलवेयरचे नाव Goldoson आहे. हे थर्ड पार्टी ॲप लायब्रेरी आहे. ज्यात या ॲप्समध्ये मेलवेयरला अपलोड केले जाते.

कसे काम करते Goldoson मेलवेयर?

रिसर्च टीमच्या माहितीनुसार, Goldoson मेलवेयर फोनच्या कोणत्याही अॅप्सची माहिती रेकॉर्ड करू शकते. एकदा फोनमध्ये आल्यानंतर हे फोनशी कनेक्टेड सर्व डिव्हाइस, वाय फाय आणि लोकेशन आणि मेसेज आदी माहिती रेकॉर्ड करणे सुरू करते. हे मेलवेयर फ्रॉड जाहिरातीच्या लिंक्स सुद्धा देतात. क्लिक केल्यानंतर पॉप अप नोटिफिकेशन देते. हे यूजर्सला खासगी डेटा १० टक्के जमा करते.

McAfee, गूगल ॲप्स डिफेंस अलायंसचे मेंबर आहे. हे गुगलचे इकोसिस्टमला मेलवेयर आणि एडवेयर पासून मूक्त करण्याचे काम करते. या संबंधी गुगल आणि डेव्हलपर्सला माहिती दिली आहे. परंतु, हे फोनमध्ये उपलब्ध असल्यास तात्काळ डिलीट करा. परंतु, भारतात या अॅप्सचा जास्त धोका नाही.

वाचाःMobile Recharge : जिओसह एअरटेलचे स्वस्तात मस्त रिचार्ज, फ्री कॉलिंगसह अनलिमिटेड 5G डेटाचीही सोय

Goldoson मेलवेयरच्या ॲप्सची लिस्ट
L.POINT with L.PAY
Swipe Brick Breaker
Money Manager Expense & Budget
GOM Player
LIVE Score
Real-Time Score
Pikicast
Compass 9: Smart Compass
GOM Audio – Music
Sync lyrics
LOTTE WORLD Magicpass
Bounce Brick Breaker
Infinite Slice
SomNote – Beautiful note app
Korea Subway Info: Metroid

वाचाःSmartphones : दमदार कॅमेरा हवाय? 200 मेगापिक्सलपर्यंतचे पर्याय,मिड-रेंज किंमतीचे हे फोन पाहिले का?

Source link

android malwareandroid malware alertandroid malware appsandroid malware goldosonandroid malware listGoldoson
Comments (0)
Add Comment