तर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे डेव्हलपर एका नवीन फीचरवर काम करत आहेत. जे व्हॉट्सॲप युजर्सना व्हिडिओ मेसेज पाठविण्यास अनुमती देणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स 60 सेकंदांचा व्हिडिओ मेसेज पाठवू शकणार आहेत.सध्या हे फीचर उपलब्ध नसले तरी यावर काम सुरु असून लवकरच हे फीचर वापरता येणार आहे.व्हिडीओ मेसेज फीचर सध्याच्या ऑडिओ मेसेज प्रमाणेच असेल असा विश्वास आहे. याचा अर्थ तुम्हाला फक्त कॅमेरा बटण टॅप करून धरून ठेवावे लागेल. त्यानंतर व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तो टॅप सोडून सेंड करु शकाता.
WhatsApp ची आणखी आगामी फीचर्स
याशिवाय आणखी काही फीचर्सवरही व्हॉट्सॲप काम करत आहे. यामध्ये जास्त लेंथच्या व्हॉइस मेसेजसाठी ट्रान्सक्रिप्शन फीचर्स दिले जातील. तसेच, व्हॉट्सॲपवरून आणखी आधुनिक व्हिडीओ कॉलिंगची सुविधा सुरू केली जाऊ शकते. याशिवाय व्हॉट्सॲप ‘मेसेज युवरसेल्फ’ फीचर सुरू करू शकते. मात्र, हे फीचर्स कधीपर्यंत लागू केले जातील, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.
WhatsApp मध्ये येत होता प्रॉब्लेम
दरम्यान नवनवीन फीचर्स व्हॉट्सअॅप अपडेट करत असताना काही तांत्रिक अडचणींमुळे व्हॉट्सअॅपला काही इश्यू देखील येत आहेत. १७ एप्रिलला समोर आलेल्या महितीनुसार बऱ्याच वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप वापरताना थोडा त्रास सहन करावा लागला होता. डाउमडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपचे जवळपास निम्म्याहून अधिक युजर्स प्रॉब्लेमचा सामना करत होते. यात ४३ टक्के युजर्सचा समावेश होता. यातील सर्वाधिक म्हणजे ४१ टक्के सर्व्हर कनेक्शनचा इश्यू घेऊन आले होते. काहींना मेसेज पाठवण्यात तर काहींना व्हिडीओ/फोटो डाऊनलोड करण्यात इश्यू येत होता. दरम्यान नवनवीन अपडेट्समुळे असे इश्यू येत असेल असं दिसून येत आहे.
वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर