अक्षय्य तृतीयेसारख्या शुभ आणि महत्वाच्या सणाला घर खरेदी करण्यापेक्षा चांगले दुसरे काहीही असू शकत नाही, परंतु घर खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्राचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचे पालन करून घर विकत घेतल्यास भरपूर नफा होईल आणि घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी, गृहप्रवेश व्यतिरिक्त, अनेकजण आपल्या घराचे नूतनीकरण करतात किंवा नवीन घराची खरेदी करतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वच्छतेची नेहमी काळजी घेतली पाहिजे.
सूर्यकिरण हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठा स्त्रोत आहेत. म्हणूनच नवीन घर घेताना सूर्याची किरणे घरात पोहोचतील याची काळजी घ्या.
घराच्या मुख्य दरवाज्यासमोर कोणतेही मंदिर नसावे, विजेचा खांब नसावा, ही सुद्धा खूप महत्त्वाची आणि विशेष गोष्ट आहे. घराचे स्नानगृह ईशान्य कोपर्यात असावे. हे देखील तुमच्यासाठी खूप शुभ आणि फलदायी असेल. बाल्कनी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी.
Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीया ‘या’ शुभ योगात, पाहा सोने खरेदीसाठी मुहूर्त आणि महत्व
स्वयंपाकघर कधीही दक्षिण-पश्चिम दिशेला नसावे. या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घराची दक्षिण-पूर्व दिशा स्वयंपाकघरासाठी उत्तम मानली जाते.
नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पूजा करताना श्लोक म्हणा, माळजप करा, आरती करा आणि घंटा वाजवा.
मास्टर बेडरूम नैऋत्य कोनात (दक्षिण आणि पश्चिमेमधली दिशा) असावे अन्यथा घरमालकाला विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
ज्योतिष व वास्तूतज्ञ डॉ. आरती दहिया
Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला पंचग्रही योग, ‘या’ ५ राशींना मिळेल अपेक्षेपेक्षा जास्त लाभ