यामुळे लागतं सूर्यग्रहण, पाहा ग्रहणाचे वैज्ञानिक आणि पौराणिक महत्व

या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण २० एप्रिलला लागणार आहे. यानंतर पहिले चंद्रग्रहण ५ मे ला आहे. चंद्रग्रहणाप्रमाणेच सूर्यग्रहणाला अनन्य साधारण महत्व आहे. सूर्यग्रहणाला घेऊन विविध प्रश्न तुमच्या मनात असतीलच तर या लेखातून जाणून घ्या सूर्यग्रहणाचे वैज्ञानिक आणि पौराणिक महत्व.

पौराणिक कथा

सूर्यग्रहणाची कथा समुद्र मंथनासोबत जुडली आहे.प्राचीन काळी देवता आणि राक्षसांनी मिळून समुद्र मंथन केलं होतं. या मंथनात १४ रत्ने निघाले होते. समुद्र मंथन मध्ये जेव्हा अमृत निघाले होते तेव्हा देवता आणि राक्षसांमध्ये घनगोर युद्ध सुरू झालं. तेव्हा श्रीविष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला आणि सर्व देवतांना अमृतपान करायला दिले.

सूर्य आणि चंद्र राहूचे शत्रू

त्याच वेळी राहू नावाच्या राक्षसाने देवाचा अवतार धारण करत अमृत प्राशन केले. चंद्र आणि सूर्यदेवांनी राहूला ओळखून घेतले आणि श्रीविष्णूंना याची माहिती दिली. श्रीविष्णूंनी क्रोधाच्या आवेशात राहूचं डोकं धडापासून वेगळं छाटून टाकलं. परंतु राहूने देखील अमृत प्राशन केले होते त्यामुळे त्याला अमरत्व प्राप्त झाले. तेव्हापासूनच राहू चंद्र आणि सूर्याला शत्रू मानू लागला. वेळोवेळी या ग्रहांना राहू यातना देतो. याच प्रक्रियेला सूर्यग्रहण म्हणतात.

खगोलीय घटना

ग्रहण एक खगोलीय घटना आहे. चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्यातून जातो, सूर्य चंद्रच्या आच्छादित रूपाने अंशिक किंवा पूर्ण स्वरूपात दिसतो तेव्हा ग्रहण लागते. म्हणजेच चंद्राच्या मागून सूर्यबिंब दिसते याच घटनेला सूर्यग्रहण असे म्हणतात.

सूर्यग्रहणाचा कालावधी

गुरुवार २० एप्रिल रोजी सूर्यग्रहण सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा खग्रास ८.७ मिनिटांनी होईल. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी ५ तास २४ मिनिटे असेल. ग्रहणाच्या वेळी, सूर्य त्याच्या उच्च राशीत मेष राशीत असेल, जेथे बुध आणि राहू देखील त्याच्याबरोबर असतील. त्याच वेळी, या ग्रहणानंतर केवळ दोन दिवसांनी गुरुची राशी बदलणार आहे. अशा स्थितीत वर्षातील पहिले सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ मानला जाणार नाही. हे सूर्यग्रहण न्यूझीलंड, फिलिपाइन्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण पॅसिफिक महासागरात दिसणार आहे.

Source link

solar eclipse 2023solar eclipse myths factssurya grahan in marathisurya grahan scientific factsचंद्रग्रहणसूर्यग्रहणसूर्यग्रहण २०२३
Comments (0)
Add Comment