तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
पुण्यासह पिंपरीतील मातब्बर राजकीय नेत्यांना तसेच पुण्यातील प्रतिष्ठित उद्योजकाला खंडणीची मागणी करून पुणे पोलिसांना आव्हान निर्माण करणारा खंडणीखोर अखेर गजाआड करण्यात आला आहे.माजी नगरसेवक दिपक धोंडीबा मिसाळ, नगरसेवक वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश वसंत मोरे, नगरसेवक अविनाश बागवे, उद्योजक अनुज गोयल यांच्यासह भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांना व्हाट्स अप कॉल करून खंडणीसाठी धमकावण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती.
पुणे पोलीसांनी सदर प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली होती. यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या नेतृत्वाखाली खंडणी विरोधी पथक – 2 यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे पुणे मॅरेज ब्युरो ग्रुपचा अॅडमिन आरोपी इम्रान शेख, रा. घोरपडी गाव व त्याचा साथीदार शाहनवाज गाझीय खान रा. गुरुवार पेठ पुणे यास मोठ्या शिफातीने ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली.
आरोपी इम्रान खान हा मॅरेज ब्युरो चालक होता. यावेळी एका मुलीचा बायोडाटा बघून इम्रान याने त्याचा साथीदार शाहनवाज याचे स्थळ मुलीच्या आईला सूचविले होते. यास मुलीच्या आईने नकार दिला होता. सदर मुलीला नंतर इम्रान याने स्वतः लग्नासाठी मागणी केली. त्यासही नकार मिळाल्याने त्याने सदर मुलीचा फोटो व बायोडाटा बनावट बनवून ती घटस्फोटित असल्याचा मजकूर व्हाट्स अपवर प्रसारित केला. यावरून पिडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून इम्रान याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणानंतर देवदास बनलेल्या इमरानने राऊडी रोमिओ होऊन मुलीला त्रास होईल या भूमिकेतून तिच्या नंबर वरून राजकिय व उद्योजक यांना धमकावून खंडणीची मागणी करू लागला होता.