तर हा Samsung galaxy tab A8 सध्या भारतीय बाजारात २१,५९९ रुपये किंमतीला मिळत आहे. ३जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज वेरियंट असणारा हा टॅब WiFi कनेक्टिविटीसह येत आहे. दरम्यान हा २१,५९९ चा टॅब तुम्ही केवळ १४,९९९ रुपयांना विकत घेऊ शकता. पण ही ऑफर अॅमेझॉन किंवा फ्लिपकार्ट या साईट्सवर नसून सॅमसंगच्या अधिकृत साईटवर अवेलेबल आहे. ग्रे आणि सिल्वर अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये हा टॅब सध्या उपलब्ध आहे.
बँकिंग ऑफर्सही मिळू शकतात
याशिवाय काही खास बँकिंग ऑफर्समुळे हा टॅब आणखी स्वस्तात तुम्ही विकत घेऊ शकता. म्हणजेच जर तुमच्याकडे HDFC बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर त्याने पेमेंट केल्यास तुम्हाला २००० रुपयांचं इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. तसच EMI वर विकत घेण्याचीही संधी आहे. तसंच Samsung galaxy tab A8 विकत घेताना तुम्हाला ९९९ रुपयांचा बुक कव्हरही फ्री मिळणार आहे. तसंच जुना डिव्हाईस एक्सचेंज केल्यास तुम्हाला आणखी अधिकचं डिस्काउंट मिळू शकतं. या सगळ्याने हा टॅब जवळपास १३ हजारांनी स्वस्त मिळू शकतो.
कसे आहेत स्पेसिफिकेशन्स?
सॅमसंगच्या या टॅब्लेटमध्ये सर्वात भारी म्हणजे १०.५ इंचाचा मोटठा डिस्प्ले आहे. तसंच अगदी बारीक बेजल्ससह सिनेमॅटिक स्टेरियो साऊंट देण्यात आला आहे. तसंच Dolby Atmos सपोर्ट असणारे क्वॉड स्पीकर्सही आहेत. दमदार बॅटरी बॅकअपसाठी 7040mAh ची क्षमता असणारी बॅटरी देण्यात आली आहे. ज्याला 15W फास्ट चार्जिंग सपोर्टेड आहे. कॅमेऱ्याचं म्हणाल तर ८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा टॅब Android आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन