ट्विटर व्यक्त केला आनंद
ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. तसेच ट्विट मधून त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. तसेच एक फोटो सुद्धा शेअर केला आहे.
कुक यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे की, जोरदार स्वागतासाठी पीएम मोदी यांचे आभार. आम्ही भारताच्या भविष्यावर सकारात्मक पूर्ण टेक्नोलॉजीसाठी आपले व्हिजन शेअर करू शकतो. शिक्षण आणि डेव्हलपर्स पासून मॅन्यूफॅक्चरिंग आणि पर्यावरण पर्यंत देशभरात वाढणाऱ्या गुंतवणुकीसाठी आम्ही कटिब्ध आहोत.
वाचाःSony Bravia 80 इंचाचा टीव्ही लाँच, घरातच मिळणार थिएटरचा एक्सपीरियन्स
टिम कुक यांनी मुंबईत खाल्ला वडापाव
सीईओ टिम कुक हे ॲपल स्टोरच्या लाँचिंगच्या एक दिवस आधी भारतात आले होते. आपल्या भारत दौऱ्यावेळी ते मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया येथे पोहोचले होते. तसेच त्यांनी मुंबईतील फेमस स्ट्रीट फूड वडापाव सुद्धा खाल्ला होता. यावेळी त्यांच्या सोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित उपस्थित होती. यावेळी त्यांनी ट्विटर आणि इंस्टाग्राम वर फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते की, वडापावपेक्षा आणखी चांगले स्वागत मुंबईत होऊच शकत नाही.
वाचाः50 मेगापिक्सलचे ४ कॅमेरे, १००० जीबीपर्यंत स्टोरेज, Xiaomi 13 Ultra ची गोष्टच वेगळी, किंमत किती?
भारतात होणार दोन ॲपल स्टोर
ॲपलने २५ वर्षानंतर भारतात आपले पहिले स्टोर ओपन केले आहे. १८ एप्रिल रोजी त्यांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स मध्ये भारतातील पहिले ॲपल स्टोर ओपन केले आहे. आता २२ एप्रिल रोजी दिल्लीतील साकेत येथे आणखी एक ॲपल स्टोर ओपन होणार आहे.
वाचाःSurya Grahan 2023 : उद्या ‘या’ वेळेत घरी बसून ऑनलाइन ‘असं’ पाहा सूर्य ग्रहण