व्हॉट्सॲप यावर्षी अनेक नवीन फीचर्स आणत आहे. गेल्या चार महिन्यांत व्हॉट्सॲप वर अनेक दमदार फीचर्स आले आहेत. आता WhatsApp ने iOS वर प्रत्येकासाठी आपले ‘स्टिकर मेकर’ टूल रिलीझ करण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सॲपच्या अपडेट्सबद्दल माहिती देणाऱ्या Wabetainfo च्या अहवालातून स्टिकर मेकर टूल आता अधिक सुधारणांसह येत असून ते ॲप स्टोअरवरून WhatsApp चे लेटेस्ट अपडेट डाऊनलोड करणाऱ्यांसाठी आहे.
नेमकं कसं काम करेल स्टिकर मेकर टूल?
स्टिकर मेकर टूल वापरकर्त्यांना ॲपमधूनच स्टिकर्स तयार करण्यास मदत करते. यामुळे आता व्हॉट्सॲप युजर्सना दुसऱ्या थर्डपार्टी ॲप्स डाऊनलोड करण्याची चिंता दूर झाली आहे. तसंच वेळेची बचत होऊन थेट व्हॉट्सॲपमध्येच स्टीकर तयार करता येत आहे.
काही आठवड्यांत युजर्सना मिळेल हे फीचर
Wabetainfo च्या अहवालात असे म्हटले आहे की हे फीचर iOS 16 वरील सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे, परंतु iOS च्या जुन्या अपडेट्समध्ये सध्यातरी हे फीचर मिळणार नाही. तसंच अहवालात म्हटल्याप्रमाणे येत्या आठवड्यात काही ग्राहकांच्या फोनमध्ये हे फीचर सुरु होईल.
WhatsApp घेऊन येतंय नवनवीन फीचर्स
युजर्सच्या गरजा लक्षात घेत व्हॉट्सॲप आणखी काही फीचर्सवरही काम करत आहे. यामध्ये जास्त लेंथच्या व्हॉइस मेसेजसाठी ट्रान्सक्रिप्शन फीचर्स दिले जाणार आहे. तसेच, व्हॉट्सॲच्या व्हिडीओ कॉलिंगमध्येही भारी अपडेट्स येऊ शकतात. याशिवाय व्हॉट्सॲप ‘मेसेज युवरसेल्फ’ फीचर सुरू करू शकते. मात्र, हे फीचर्स कधीपर्यंत लागू केले जातील, याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.
वाचाःAirtel चं सिम वापरता? ‘या’ पाच रिचार्जसोबत फ्री मिळेल हॉटस्टार किंवा प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन