Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन असणारे रिचार्ज
एअरटेलच्या ४९९ रुपये, ८३९ रुपये आणि ३३६९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्ससोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या तिन्ही प्लॅन्समध्ये सर्व ग्राहकांना अनलिमेटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस मिळणार आहेत. यातील ३३५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २.५जीबी डेटा, ८३९ मध्ये दररोज २जीबी डेटा आणि ४९९ मध्ये दररोज ३जीबी डेटा मिळणार आहे आता या तिन्हीची जर वैधता पाहाल तर ३३५९ रुपयांचा प्लॅन ३६५ दिवसांसाठी, ८३९ रुपयांचा प्लॅन ८४ दिवसांसाठी आणि ४९९ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांसाठी कंपनीने दिला आहे. यामध्ये ३३५९ रुपयांच्या रिचार्जमध्ये एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन, अनलिमिटेड ५जी डेटा, अपोलो 24/7 सर्कल आणि फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक तसंच फ्री हेलोट्यून्स अशा विविध ऑफर्स आहेत. तर ८३९ आणि ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन महिन्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
Amazon prime video चं सब्सक्रिप्शन असणारे रिचार्ज
एअरटेलच्या ६९९ रुपये आणि ९९९ रुपयांच्या रिचार्ज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या दोन्ही रिचार्जचा विचार केला तर या दोन्ही प्लॅन्समध्ये सर्व ग्राहकांना अनलिमेटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस मिळणार आहेत. यातील ६९९ रुपयांचा रिचार्ज ५६ दिवसांच्या तर ९९९ रुपयांचा रिचार्ज ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. दोन्ही रिचार्जमध्ये रिचार्जच्या वैधतेइतकीच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची मेम्बरशीप मिळणार आहे. तसंट डेटाचं म्हणाल तर ६९९ मध्ये दररोजसाठी ३जीबी आणि ९९९ मध्ये दररोज २.५जीबी डेटा मिळणार आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा