Apple Retail Store : मुंबई पाठोपाठ दिल्लीतही ॲपलचं रिटेल स्टोर, दिल्लीकरांनी केली मोठी गर्दी

नवी दिल्ली :Apple Store Saket : जगातील सर्वात प्रीमियम टेक कंपनी ॲपलनं आता भारतात मोठी गुंतवणूक करत आपले रिटेल स्टोअर्स टाकण्यास सुरुवात केली आहे. १८ एप्रिलला मुंबईत देशातील पहिलं वहिलं ॲपल रिटेल स्टोअर उघडल्यानंतर आता राजधानी दिल्ली येथे आपलं दुसरं स्टोअर उघडलं आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक स्वत: उद्घाटनावेळी दिल्ली येथे उपस्थित असून दिल्लीकरांनीही या स्टोअर ओपनिंगला मोठ्या प्रमाणात हजेरी लावत मोठी गर्दी केली होती. या स्टोअरच्या उद्घाटनाचे आणि तेथे झालेल्या गर्दीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कुक यांनी स्वत: दिल्लीकरांचं स्वागत केलं असून चाहत्यांनी दुकान उघडण्याआधीपासूनच बाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. ॲपलने दिल्लीतील साकेत येथे सिटी वॉक मॉलमध्ये आपले देशातील दुसरे रिटेल स्टोअर उघडले आहे. आज म्हणजेच गुरुवारी (२० एप्रिल २०२३) सकाळी १० वाजता टीम कुक यांच्या उपस्थितीत स्टोअर उघडले गेले. दिल्लीतील या ॲपल स्टोअरमध्ये एकूण ७० कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे यातील ५० टक्के महिला कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी एकत्रितरित्या १५ वेगवेगळ्या भाषांमध्ये संवाद साधू शकतात. यामुळे या ठिकाणी सर्वप्रकारच्या सर्वभाषिक ग्राहकांना भारी अनुभव मिळेल.

या खास सुविधांचा ग्राहकांना घेता येणार लाभ
तसंच भारतीय ग्राहकांना स्टोअरमध्ये पिकअप, ॲपलच्या तज्ज्ञांशी (Genius) संवाद यासारख्या सेवा देखील मिळणार आहेत. याशिवाय जगातील इतर ॲपल स्टोअर्समध्ये असणाऱ्या खास अशा विविध सुविधा देखील याठिकाणी आहेत. त्यातीलच एक म्हणजे ॲपल ट्रेड इन प्रोग्राम. तर या ॲपल ट्रेड इन प्रोग्राम अतंर्गत याठिकाणी खरेदीदार त्यांचे जुने iPhone, Mac, iPad असे ॲपल डिव्हाईस नवीन डिव्हाईस घेण्यासाठी एक्सचेंज करू शकतात. हाच ट्रेड इन प्रोग्राम Apple BKC येथे देखील उपलब्ध आहे.

वाचा :Tim Cook: ॲपलचे CEO टिम कुक यांनी घेतली पीएम मोदींची भेट, भारताला दिली ही भेट

Source link

appleApple productsapple retail storeapple storesaket apple storeTim Cookॲपल प्रोडक्ट्सॲपल फोनॲपल साकेत स्टोरॲपल स्टोर
Comments (0)
Add Comment