Twitter Blue Subscription : अमिताभ बच्चन, सचिन पासून राहुल गांधीपर्यंत या सेलिब्रेटिंजचे ब्लू टिक गायब

नवी दिल्लीःTwitter Blue Tick Gone : माइक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर ने सर्व लोकांचे आणि ऑर्गेनायझेशन अकाउंटचे ब्लू टिक गायब केली आहे. आता केवळ ‘ट्विटर ब्लू’ सब्सक्रिप्शनसाठी पेमेंट केल्यानंतर त्यांच्या प्रोफाइलला व्हेरिफिकेशन ब्लू टिक मार्क मिळणार आहे. ट्विटरने हे अचानक केले नाही. एलन मस्क यांनी याची पहिली घोषणा केली होती. अशा सर्व अकाउंटवरून ब्लू टिक हटवली जाईल. जे पेड सब्सक्रिप्शन घेणार नाहीत. ट्विटरने ट्विट करून ब्लू टिक हटवण्याची तारीख सुद्धा सांगितली होती. जी २० एप्रिल होती. आता मोठ्या स्टार्स पासून राजकीय लोकांपर्यंतच्या ब्लू टिक काढून टाकली आहे.

मोठे स्टार्स आणि राजकारण्यांचा समावेश
अनेक बॉलिवूड सेलेब्रिटीच्या अकाउंट वरून आता ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे. ज्यात शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आलिया भट्टसह अनेकांचा समावेश आहे. तसेच अनेक बड्या राजकारण्यांचा सुद्धा यात समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या नावाचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, सौरव गांगुली यांनी सुद्धा व्हेरिफाइड ब्लू टिक गमावली आहे. रोनाल्डोच्या ट्विटरवर १०० मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत. त्याचे ब्लू टिक गायब करण्यात आले आहे.

वाचाःGoogle Storage: गुगल स्टोरेज फुल झालंय? बॅकअपसाठी ‘या’ सोप्या टीप्सचा करा वापर

ब्लू टिकसाठी मोजावे लागतील पैसे
Twitter Blue हवी असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळे रेट आहेत. संयुक्त राज्यात आयओएस किंवा अँड्रॉयडी यूजर्ससाठी $ 11 प्रति महिना किंवा $ 114.99 प्रति वर्ष आणि वेब यूजर्ससाठी $ 8 प्रति महिना किंवा $ 84 प्रति वर्ष. भारतात iOS साठी ट्विटर ब्लूची किंमत ₹900 प्रति महिना आणि वेबसाठी ₹650 प्रति महिना आहे. तर iOS साठी वार्षिक, किंमत ₹9400 आहे. Android यूजर्ससाठी दर महिना ₹900 रुपये आणि वार्षिक किंमत ₹9,400 रुपये मोजावे लागणार आहेत.

वाचाःनवा SmartPhones घ्यायचा विचार करताय? थांबा, मे महिन्यात येतायत एका पेक्षा एक भारी फोन्स

Source link

twitter blue subscriptiontwitter blue subscription chargeTwitter Blue Subscription gonetwitter blue subscription indiatwitter blue subscription plantwitter blue subscription service
Comments (0)
Add Comment