तर सध्याच्या घडीला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतानाही कोणतीही माहिती किंवा मोठी घोषणा होणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे ट्विटर. इतकं महत्त्वाचं हे साधन असल्यानं जवळपास सर्वच महत्त्वाच्या व्यक्तींची खाती ट्विटरवर आहेत. त्यात कितीतरी अकाउंट ट्विटरवर असल्याने नेमकं अकाऊंट कोणतं कोणाचं हे माहित असण्यासाठी एक ट्विटरतर्फे ब्लू टिक वेरिफाय असल्याचं साधन म्हणून दिलंं जातं… पण आता ही टिक मिळवायची असल्यास दरमहा सब्सक्रिप्शन विकत घ्यावं लागणार आहे. ज्यांच्याकडे आता हे सब्सक्रिप्शन नाही त्यांची ब्लू टिक काढण्यास ट्विटरने सुरुवात केली आहे.
मस्क यांनी आधीच दिला होता अल्टिमेटम
ट्विटरवरील ब्लू टिक काढून टाकण्यासाठी ट्विटरने आधी १ एप्रिलची अंतिम मुदत जाहीर केली होती. मात्र, आता मस्क यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजेच १२ एप्रिलला 4/20 असं ट्वीट करत २० एप्रिल ही एकप्रकारे अंतिम तारीख दिली होती. ज्यानुसार आता ट्वीटरने आपली कारवाई सुरु केली असून ब्लू टिक गायब होण्यास सुरुवात झाली आहे.
आता पुढे काय?
ट्विटरची ही ब्लू टिक काढणार असल्याची घोषणा केल्यावरच मस्क यांनी यापुढे ब्लू टिक हवी असल्यास सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार असल्याचं सांगितलं होतं. तर सब्सक्रिप्शन म्हणजे एकंदरीत काय तर दरमहिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. तर आता या सब्सक्रिप्शनचा विचार केल्यास वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वेगवेगळे रेट आहेत. संयुक्त राज्यात आयओएस किंवा अँड्रॉयड यूजर्ससाठी दरमहा ११ डॉलर्स किंवा ११४.९९ डॉलर्स वार्षिक असे रेट असतील. याशिवाय वेब यूजर्ससाठी दरमहा ८ डॉलर्स किंवा वार्शिक ८३ डॉलर्स असे रेट आहेत. तर भारतात iOS साठी ट्विटरच्या सब्सक्रिप्शनची किंमत दरमहा ९०० रुपये आणि वार्षिक ९४०० रुपये असेल. अॅन्ड्रॉईड युजर्ससाठीही हीच किंमत ठेवण्यात आली आहे.
वाचा :Twitter Blue Subscription : अमिताभ बच्चन, सचिन पासून राहुल गांधीपर्यंत या सेलिब्रेटिंजचे ब्लू टिक गायब