delta plus variant in thane: चिंता वाढली! आता ठाण्यातही आढळले डेल्टाप्लसचे नवे रुग्ण

हायलाइट्स:

  • आता ठाण्यातही आढळले डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४ रुग्ण.
  • राज्यात करोना विषाणूच्या नव्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे एकूण ४९ रुग्ण.
  • न घाबरता वेळीच रुग्णालयात जाणे- आरोग्यमंत्री राजेश टोेपे यांचे आवाहन.

ठाणे: राज्यात करोना विषाणूच्या नव्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटचे ४५ रुग्ण सापडल्यानंतर आता ठाण्यातही या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्हयातील करोना रुग्णवाढीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश मिळत असताना आता करोनाचा या नव्या व्हेरिएंटने ठाण्यात शिरकाव केल्याने वैद्यकीय यंत्रणेसाठी चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

ठाण्यात आढळले डेल्टा प्लसचे ४ रुग्ण

महानगरपालिकांचा विचार करता ठाणे महापालिका क्षेत्रात या नव्या विषाणूचे ३ तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १ रुग्ण आढळला आहे. या रुग्णांमध्ये २५ वर्षांखालील २ रुग्ण, तर ५६ वर्षांखालील २ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: दुसऱ्या लाटेतील मृत्यूसंख्येचा निचांक; आज राज्याला मोठा दिलासा

डेल्टा प्लसच्या या चारही रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र हे रुग्ण ज्या लोकांच्या संपर्कात आले आहेत, अशा सर्वांची तपासणी केली जात आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कैलाश पवार यांनी दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- सरकारमध्ये आल्यावर हॉकी स्टिक सांभाळून वापरावी लागते; मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना मिश्किल सल्ला

डेल्टा प्लसचे रुग्ण ४५ वरून ४९ वर

राज्यात एकूण ४५ डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र आता ठाणे जिल्ह्यात आणखी ४ रुग्ण आढळल्याने ही संख्या आता ४९ वर जाऊन पोहोचली आहे. यात २९ पुरूष आणि २० महिलांचा समावेश आहे. ठाण्याव्यतिरिक्त राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि रत्नागिरीत आतापर्यंत डेल्टा प्लसचे व्हेरिएंट आढळले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- अविनाश भोसलेंना ईडीचा मोठा दणका; ४ कोटींची मालमत्ता केली जप्त

राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटसची ही स्थिती असली तरी देखील नागरिकांनी घाबरून न जाता योग्य वेळी रुग्णालयात दाखल व्हावे,असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

Source link

4 patients of delta plusdelta plus patients in thane districtdelta plus variantठाण्यात आढळले डेल्टा प्लसचे रुग्णडेल्टा प्लस व्हेरिएंट
Comments (0)
Add Comment