नवी दिल्लीःTwitter Blue Tick Gone : माइक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरची मालकी मिळवल्यापासून एलन मस्क यांनी धडाडीचे आणि तितकेच धक्कादायक निर्णय घेतले आहेत. ज्यांना फ्री मध्ये ब्लू टिक मिळत होती. ती सर्विस एलन मस्क यांनी पेड केली आहे. यासाठी यूजर्सला आता महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. २० एप्रिलपर्यंत तुम्ही जर पेड सर्विस घेतली नसेल तर तुम्हाला मिळालेले ब्लू टिक हटवले जाईल. असा इशारा दिल्यानंतर ट्विटरने रात्री १२ वाजता अनेकांच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक हटवली आहे. या यादीत बॉलिवूडमधील सेलिब्रिटीजच्या दिग्गज अभिनेत्याचा समावेश आहेत. यात शाहरूख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार याचा समावेश आहे.
ट्विटरने ब्लू टिक हटवण्याची घोषणा केली होती
याआधी ट्विटरकडून ब्लू टिक हटवण्याची घोषणा केली होती. मायक्रोब्लॉगिंग साइट अकाउंट्सचे व्हेरिफाइड ब्लू टिक काल रात्री हटवण्यात आली आहे. एलन मस्क यांनी ट्विटरच्या खरेदी आधी ज्यांना ज्यांना ब्लू टिक फ्री मध्ये मिळाली होती. त्या सर्व लोकांची ब्लू टिक २० एप्रिल पासून हटवली गेली आहे. सुरुवातीला ब्लू टिक प्रसिद्ध व्यक्तीला फेक अकाउंट पासून सुरक्षित राहण्यासाठी आणि खोट्या बातम्या पासून सुटका करण्यासाठी हे काम केले जात होता. याआधी मार्च महिन्यात ट्विटरने आपल्या अधिकृत हँडलवरून पोस्ट केले होते की, १ एप्रिलला आम्ही लीगेसी व्हेरिफाइड प्रोग्रामला संपवणार आहोत. तसेच व्हेरिफाइड ब्लूला हटवणार आहोत. ट्विटरवर ब्लू टिक जारी ठेवण्यासाठी लोक पेड सर्विस घेऊ शकतात.

वाचाःनवा SmartPhones घ्यायचा विचार करताय? थांबा, मे महिन्यात येतायत एका पेक्षा एक भारी फोन्स
प्रीमियम झाले ब्लू टिक
ट्विटरने सर्वात आधी ब्लू चेक मार्क सिस्टम २००९ मध्ये यूजर्सला ओळख मिळवण्यासाठी ही सर्विस प्रसिद्ध व्यक्ती, राजकीय नेते, कंपन्या आणि ब्रँड, न्यूज सर्विस, तसेच सार्वजनिक हित जोपासणाऱ्या व्यक्तीला ही सर्विस बहाल करण्यात येत होती. कंपनीने आधी यासाठी व्हेरिफिकेशन चार्ज घेतला नव्हता. एलन मस्क यांनी २०२२ मध्ये कंपनीची मालकी मिळवल्यानंतर दोन आठवड्यात प्रीमियम सर्विस लागू केली आहे. त्यासाठी ट्विटर ब्लू लाँच करण्यात आली होती.
वाचाःTwitter Blue Subscription : अमिताभ बच्चन, सचिन पासून राहुल गांधीपर्यंत या सेलिब्रेटिंजचे ब्लू टिक