ट्विटर ब्लू मुळे यूजर्सना मिळणार हे फीचर्स
ट्विटरनुसार, ट्विटर ब्लूचा प्लॅन घेणार्या यूजर्सना इतरांपेक्षा जास्त फीचर्स वापरण्याची सुविधा मिळेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सबस्क्रिप्शन घेणार्या यूजर्सला एडिट ट्विट बटण, 1080p व्हिडिओ अपलोड, रीडर मोड आणि ब्लू टिकची सुविधा मिळेल. ही सेवा घेणारे युजर्स 4000 कॅरेक्टरपर्यंत ट्विट पोस्ट करू शकतील. अर्थात या साऱ्या नव्या फीचर्ससाठी ट्वीटर ब्लूचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार असून यासाठी युजर्सना पैसेही मोजावे लागणार आहेत.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
भारतात ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत किती?
ट्विटरने भारतातही ब्लू सबस्क्रिप्शन योजना सुरू केली आहे. ही योजना घेतल्यावर युजर्स स्पेशल फीचर्स वापरू शकतील. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही मोबाईल वापरकर्त्यांना ट्विटर ब्लूसाठी दरमहा ९०० रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, वेब वापरकर्त्यांना यासाठी ६५० रुपये द्यावे लागतील. Twitter Blue च्या वर्षभराच्या सबस्क्रिप्शन प्लॅनची किंमत ९,४०० रुपये आहे.
वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
आधी ‘या’ ठिकाणी सुरु झालं ट्विटर ब्लू
नुकतंच ट्विटरने भारतात हे सब्सक्रिप्शन आणलं असून त्याआधी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह काही देशांमध्ये ट्विटर ब्लू सेवा सुरू केली आहे. लाँच करताना, Twitter ने सांगितले की Google चे Android वापरकर्ते आणि iOS वापरकर्ते Twitter Blue चे मासिक सदस्यता $11 (सुमारे ९०० रुपये) मध्ये खरेदी करू शकतील. त्याच वेळी, एक वर्षाचा सबस्क्रिप्शन प्लॅन घेणार्या वापरकर्त्याला अधिक सूट दिली जाईल.
वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन
कसं घ्याल ट्विटर ब्लूचं सब्सक्रिप्शन?
सर्वात आधी Twitter मोबाईल अॅप किंवा वेबवर ओपन करा. दरम्यान वेब आणि मोबाईल दोन्हीच्या प्लॅनची किंमत वेगवेगळी आहे. मोबाईलसाठी दरमहा ९०० रुपये आणि वेबसाठी ६५० दरमहा द्यावे लागतील. तर ट्विटर ओपन केल्यावर डाव्या बाजूला आपल्या प्रोफाइलवर टॅप करून त्यानंतर Twitter Blue हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला मासिक योजना आणि वार्षिक योजना दिसेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही एक योजना निवडू शकता. त्यानंतर सबस्क्रिप्शनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. पेमेंट आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही ब्लू सबस्क्रिप्शन घेऊ शकाल. यानंतर ब्लू टिकची प्रक्रिया सुरू होईल. याला काही वेळ देखी लागू शकतो. दरम्यान तुम्हाला मोबाईल नंबरही वेरिफाय करावा लागणार आहे.
वाचा :Samsung Galaxy A24 लाँच होण्याआधीच फीचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह आणखी बरच काही, किंमत किती?
या लोकांसाठी ब्लू टिक मोफत
ब्लू टिक सब्सक्रिप्शन न घेऊनही ‘अधिकृत’ अर्थात वेरिफाय हे लेबल निवडक खात्यांना दिले जाणार आहे. ज्यात प्रमुख मीडिया आउटलेट आणि सरकार यांचा समावेश आहे. तसेच, त्यांच्याशी संबंधित प्रमुख लोकांना Twitter Verified Checkmark साठी पैसे द्यावे लागणार नाहीत. उदाहरणार्थ एकीकडे भारतात सचिन, शाहरुक, विराट अशी खाती वेरिफाय नसली तरी नरेंद्र मोदी यांचे खाते मात्र वेरिफाय आहे. त्यांना वेगळ्या प्रकारची टिक दिली गेली आहे.
वाचा :Netflix, Prime, Hotstar: आता अनलिमिटेड मूव्हीसह, वेब सीरीजचीही घ्या मजा, पाहा सर्व प्लॅन्सची माहिती सविस्तर