BSNL चा 200 mbps वाला प्लॅन
बीएसएनएल ने भारत फायबर कनेक्शनच्या माध्यमातून प्रिमीय प्लस प्लॅन आणला आहे. यामध्ये 200 mbps ची हाय स्पीड असणारी कनेक्टिव्हिटी असून याची किंमत १२९९ इतकी आहे. यामध्ये तब्बल ४००० जीबी डेटा मिळणार असून डेटा संपल्यावर 15mbps इतकी स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कोणतीही ओटीटी सर्व्हिस ग्राहकांना मिळणार नाही. पण फ्री कॉलिंगची सुविधा नक्कीच मिळेल.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Airtel चा 200 mbps वाला प्लॅन
एअरटेलच्या च्या प्लॅनमध्ये ओटीटी सर्व्हिसेसचा फायदा ही मिळणार नाही. यातील एंटरटेनमेंट पॅक असं एका प्लॅनचं नाव असून त्याची किंमत ९९९ रुपये आहे. यात 200 mbps ची स्पीड मिळणार असून ३.३ टीबी म्हणजेच ३३०० जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स बेनिफिट्स मिळणार असून यामुळे Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Wynk Music यासारख्या OTT सर्व्हिसेस मिळणार आहेत.
वाचा :Blue tick : सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या रोनाल्डोपासून ते विराट सर्वांची ब्लू टिक गेली, आता पुढे काय?
Excitel चा 200 mbps वाला प्लॅन
एक्साईटेल 200 mbps, 300 mbps आणि 400 mbps असे प्लॅन्स असून यामध्ये 200 mbps वाला प्लॅन सर्वात स्वस्त
आहे. एक्साईटेलचा हा प्लॅन ७९९ रुपयांचा आहे यामध्ये 200 mbps स्पीडसह अनलिमिटेड डेटा मिळेल.
वाचा :Samsung Galaxy A24 लाँच होण्याआधीच फीचर्स लीक, 50MP कॅमेऱ्यासह आणखी बरच काही, किंमत किती?