नवी दिल्ली :Xiaomi Pad 6 pro : बजेट स्मार्टफोन्सपासून ते अगदी हायटेक फोन्सही आता Xiaomi कंपनी लाँच करत आहेत. आता काही दिवसांपूर्वी Xiaomi 13 Ultra या स्मार्टफोनच्या लाँचिग इव्हेंटवेळी बरेच प्रोडक्ट्स लाँच केले. यावेळी त्यांनी दोन लेटेस्ट टॅब्लेटही लॉन्च केले आहेत. Xiaomi Pad 6 आणि Xiaomi Pad 6 Pro टॅब्लेट लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही टॅब्लेटचे स्पेक्स पाहून अनेकांना हे आवडले असून Xiaomi Pad 6 pro ने तर प्री बुकिंगमध्ये अगदी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.चीनच्या एका टेक्नोलॉजीसंबधित बातम्या देणाऱ्या वृत्तसंस्थने दावा केल्याप्रमाणे Xiaomi Pad 6 pro ने चीनची प्रसिद्ध ई कॉमर्स साईट जेडी आणि टीमॉल यांच्यावर प्री सेल बुकिंगचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर इतकी पसंती मिळणारा हा टॅब्लेट नेमका कसा आहे याची किंमत किती आहे जाणून घेऊ…
कसे आहेत स्पेसिफिकेशन्स?
Xiaomi pad 6 pro मध्ये ११ इंचाचा IPS LCD डिस्प्ले 1800×2880 पिक्सलच्या रेज्यूलेशनवर आधारीत आहेत. याचा रिफ्रेश रेटही 144Hz इतका आहे. डिझाईनच्या दृष्टीनं अगदी स्लीक आणि स्लिम असा हा टॅब आहे.यात कंपनीनं लेटेस्ट सॉफ्टवेअर वर्जनचा सपोर्ट दिला गेला आहे.
कसे आहेत स्पेसिफिकेशन्स?
Xiaomi pad 6 pro मध्ये ११ इंचाचा IPS LCD डिस्प्ले 1800×2880 पिक्सलच्या रेज्यूलेशनवर आधारीत आहेत. याचा रिफ्रेश रेटही 144Hz इतका आहे. डिझाईनच्या दृष्टीनं अगदी स्लीक आणि स्लिम असा हा टॅब आहे.यात कंपनीनं लेटेस्ट सॉफ्टवेअर वर्जनचा सपोर्ट दिला गेला आहे.
तर Xiaomi Pad 6 Pro मागील वर्षीचा फ्लॅगशिप क्वॉलकॉम प्रोसेसर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरनी सुसज्ज आहे. हा टॅब्लेट Android 13 वर आधारीत आहे. MIUI Pad 14 युजर्स इंटरफेस या टॅब्लेटमध्ये दिसून येत आहे. बॅटरीचं म्हणाल तर Xiaomi Pad 6 Pro मध्ये ८६०० mAh बॅटरीसह 67W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय Xiaomi Pad 6 Pro मध्ये ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
किंमतीचं काय?
Xiaomi Pad 6 Pro चं बेसिक वेरियंट ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसह येत असून त्याची किंमत २६९९ युआन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास ३२ हजार रुपये इतकी असणार आहे.
वाचा : पहिल्या iPhone लाँचनंतर १५ वर्षांनी उघडलं भारतातील Apple Retail Store, कसा आहे हा खास प्रवास?