Eid Mubarak Wishes in Marathi: रमजान ईदच्या ‘या’ शुभेच्छांचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

मुस्लिम कॅलेंडरमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर रमजान ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार आहे. २२ एप्रिल २०२३ रोजी ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होणार आहे. ईद निमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल असते. दूध, सुकामेवा आणि शेवया या पासून बनवलेल्या शीर खुरमाचे विशेष महत्त्व असते. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते. मुस्लिम बांधव यंदा उत्साहात ईद साजरी करत असून, ईदनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी या संदेशाचा होईल उपयोग.

ईद-उल-फितरच्या हार्दिक शुभेच्छा

“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो,
तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो,
सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!”

“चंद्रमाला पाहूनी खोलूया रोजा
ईद निमित्त मागूया खुदाला ईच्छा
ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा”

रमजान ईदच्या शुभेच्छा

“यंदाची रमजान ईद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा
ईद-उल-फितरच्या हार्दिक शुभेच्छा”

“बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्वबंधुत्व वाढीस लावूया,
ईद दिनी हीच करून मनी इच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा…
ईद मुबारक!”

रमजान ईद मुबारक

“फुलांना बहर मुबारक
शेतकऱ्याला पीक मुबारक
पक्ष्यांना उडान मुबारक
चंद्राला तारे मुबारक
आणि तुम्हास रमजान मुबारक”

“ईद घेऊन येई आनंद
जोडू मनामनांचे बंध
सणाचा हा दिवस खास
ईद मुबारक तुम्हा सर्वांस
रमजान ईद मुबारक!”

ईदच्या खूप खूप शुभेच्छा

“तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईद
सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच सदीच्छा!
रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा”

“अल्लाह आपणास ईद च्या या शुभ दिवशी
सर्व प्रकारचे आनंद, सुख शांती आणि प्रेम देवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!”

Source link

eid mubarak 2023ramzan eid imagesramzan eid quotes messagesramzan eid shubhechharamzan eid statusramzan eid wishes in marathiईद मुबारकरमजान ईद २०२३रमजान ईदच्या शुभेच्छा
Comments (0)
Add Comment