सर्वात आधीतर तुम्हाला एक थर्डपार्टी ॲप डाऊनलोड करावं लागेल. “WhatsDelete: Recover Deleted Messages” नावाचे ॲप इंस्टॉल करावे लागेल. हे ॲप इंस्टॉल केल्यानंतर, तुम्हाला सर्वप्रकारच्या परमिशन या ॲपला द्याव्या लागतील. जेणेकरून हे ॲप योग्यरित्या आपले कार्य करू शकेल.
वाचा : पहिल्या iPhone लाँचनंतर १५ वर्षांनी उघडलं भारतातील Apple Retail Store, कसा आहे हा खास प्रवास?
आणि मग डिलीट केलेले मेसेजही दिसतील…
तर हे ॲप इंस्टॉल केल्यावर तुम्हाला व्हॉट्सॲपवर काही सेटिंग्ज कराव्या लागतील. त्यासाठी आधी WhatsApp उघडा आणि त्यात वरच्या बाजूस असणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. सेटिंग्जवर जा आणि डेटा आणि स्टोरेज वापरावर टॅप करा. मीडिया ऑटो डाउनलोड वर जा आणि सर्व पर्यायांना परमिशन द्या. त्यानंतर जर कोणी तुम्हाला मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडीओ क्लिप पाठवून ती डिलीट करत असेल, तर त्यानंतर तुम्हाला तेच ॲप उघडावे लागेल जे तुम्ही डाउनलोड केले आहे. व्हॉट्सॲप डिलीट ॲप उघडल्यानंतरच तुम्हाला डिलीट केलेला मेसेज, ऑडिओ किंवा व्हिडिओ दिसेल. तुम्ही ती मीडिया फाईल पुन्हा मिळवू देखील शकता.
वाचा :Smartphones : जबरदस्त फीचर्स सोबत स्टायलिश डिझाइनचे टॉप ५ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी