अक्षय्य तृतीयेला ‘या’ शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा सण अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास ती तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरावर कृपा राहते, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेला केलेले प्रत्येक कार्य अक्षय्य फळ देते. म्हणूनच या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्द आहे. तेव्हा या खास सणाला शुभेच्छा देऊन साजरं करूया.

अक्षय्य तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा

“तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
लक्ष्मीचा सदैव वास राहो..
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो..
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा”

“अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,
माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी
सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…”

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

“आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..”
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

“प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..”
अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!

अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

“आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!”

“अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!”

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

“तुमच्या घरी सुख-समृद्धीची लाट येऊ दे,
तुमच्या आनंदाला कोणाची नजर ना लागू दे,
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहू दे,
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…”

“सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी,
जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा..”

Source link

akshay tritiya hardik shubhechhaAkshaya Tritiya 2023Akshaya Tritiya imagesAkshaya Tritiya messagesAkshaya Tritiya quotesAkshaya Tritiya statusAkshaya Tritiya Wishes in Marathiअक्षय्य तृतीयाअक्षय्य तृतीया २०२३अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
Comments (0)
Add Comment