Oppo A54 5G (किंमत १४,९९० रुपये)
कॅमेऱ्यासाठी प्रसिद्ध असणारी ओप्पो कंपनीचे फोन अलीकडे फ्लॅगशिप फोन म्हणूनही समोर येत आहेत. अशात १५ हजारांच्या आतच्या बजेटमध्ये एक दमदार फोन ओप्पो कंपनीनं आणला आहे. या फोनचं नाव Oppo A54 5G असं असून ६.५१ इंचेसचा हा फोन पंच-होल डिस्प्लेसह येतो. या फोनला दमदार अशी 5000mAh ची बॅटरी असून 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला रियर कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सल देण्यात आला आहे.
वाचा : पहिल्या iPhone लाँचनंतर १५ वर्षांनी उघडलं भारतातील Apple Retail Store, कसा आहे हा खास प्रवास?
Redmi 12C (किंमत १३,९९९ रुपये)
शाओमीचा हा बजेट फोन दमदार परफॉर्मेंससाठी ओळखला जातो. लॅग फ्री अनुभव हा फोन देत असून MediaTek Helio G85 प्रोसेसरवर हा फोन काम करतो. 5000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये असून ६.७१ इंचाचा HD+ डिस्प्ले फोनमध्ये आहे. याशिवाय ५० मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
आणि ६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा फोनमध्ये आहे. तर ६जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज फोनमध्ये आहे.
वाचाःWindow AC ला बाहेरच्या बाजुने का लावतात, कधी विचार केलाय?, जाणून घ्या नेमकं कारण
Moto G13 (किंमत १३,९९९ रुपये)
Moto G13 हा देखील कमी बजेटमध्ये एक दमदार स्मार्टफोन आहे. Moto G13 स्मार्टफोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि स्टिरीओ स्पीकर आहेत. हे स्पीकर्स डॉल्बी अॅटमॉससह येतात. ६.५ इंचाचा HD+ LCD डिस्प्ले फोनमध्ये आहे. फोनमध्ये स्प्लॅश रेझिस्टंट बिल्ड, नियर स्टॉक अँड्रॉइड यूजर एक्सपीरियन्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. 5000mAh बॅटरी या फोनमध्ये बसवण्यात आली आहे.
वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
Samsun Galaxy M13 (किंमत ११,६९९ रुपये)
या यादीत सॅमसंग कंपनीचा फोनही असून सॅमसंगचा M सिरीजमधील हा फोन तब्बल 6000mAh च्या बॅटरीसह देण्यात आला आहे. Exynos 850 प्रोसेसर या फोनमध्ये असून एक तगडा डिस्प्ले फोनमध्ये आहे. तसंच रेअर पॅनलवर ५० मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनचा लूकही जबरदस्त असून अॅक्वा ग्रीन, मिडनाईट ब्लू आणि स्टारडस्ट ग्रीन कलरमध्ये फोन उपलब् आहे. ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज फोनमध्ये आहे.
वाचा :SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन
Realme narzo N55 (किंमत १०,९९९ रुपये)
तर रिअलमी नार्जो एन५५ हा एक कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स असणारा रिअलमी कंपनीचा फोन आहे. याच्या सुरुवातीच्या मॉडेलची किंमत १०,९९९ इतकी आहे. विशेष म्हणजे या सेगमेंटमध्ये 33W चार्जिंग सपोर्ट असणारा हा फोन असून ६४ मेगापिक्सेल एआय कॅमेरा याला देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले ६.७२ असा मोठा आणि Full HD+ असा आहे. तसंच १२जीबी डायनामिक रॅम आणि Mediatek Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. तसंच ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज तसंच ६जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज अशा दोन ऑप्शन्समध्ये हा फोन उपलब्ध आहे.
वाचा :Twitter News: ट्विटरला का आणावं लागलं ब्लू टिक सब्सक्रिप्शन? ‘हे’ आहे त्यामागचं खरं कारण