हायलाइट्स:
- चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यावर असणार लक्ष.
- गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड.
- दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल.
म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर
गणेशोत्सवाला महिनाभर वेळ असला तरी तयारी मात्र आतापासूनच सुरु झाली आहे. केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केलेली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी कडक अंमलबजावणी होणार आहे. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाईल, असे आदेश मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी दिले. (Strict ban on POP idols in Chandrapur city)
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत पीओपी मूर्ती बंदी संदर्भात शहरातील मूर्तिकाराची बैठक सोमवारी घेण्यात आली. सदर बैठकीत पीओपी मूर्तींवर बंदी संदर्भात मूर्तिकार प्रतिनिधीची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली.
क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सची बैठक संपली; निर्बंधांत आणखी शिथिलता मिळणार का?
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत पीओपी मूर्तींवर पूर्णतः बंदी राहणार आहे. त्यात पीओपी मूर्तींची निर्मिती करणे, बाहेरून आयात करणे व विक्री न करणे आदी बाबींचा समावेश आहे.
क्लिक करा आणि वाचा- माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्याची केली तक्रार; म्हणाले…
क्लिक करा आणि वाचा- सरकारमध्ये आल्यावर हॉकी स्टिक सांभाळून वापरावी लागते; मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना मिश्किल सल्ला