६५ इंचाचा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही, मूव्ही पाहायला थिएटरमध्ये जाण्याची गरज नाही

नवी दिल्लीःCheapest 65 inch Smart TV: आपल्या घरात मोठा टीव्ही असायला हवा, असे सर्वांनाच वाटते. परंतु, मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेल अंतर्गत iFFALCON चा ६५ इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. याची खरी किंमत १ लाख २० हजार ९९० रुपये आहे. तुम्ही या टीव्हीला ईएमआय वर सुद्धा खरेदी करू शकता. जाणून घ्या या टीव्हीवर मिळत असलेली ऑफर्स, खास फीचर्स आणि टीव्हीची किंमत.

iFFALCON by TCL LED Smart Google TV ची किंमत
या टीव्हीची किंमत १ लाख २० हजार ९९० रुपये आहे. याला ७० हजार ९९१ रुपये डिस्काउंट सोबत ४९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. ही किंमत ६५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची आहे.

EMI आणि बँक ऑफर्स
HDFC बँक क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यानंतर १० टक्के ऑफ दिला जात आहे. तर ईएमआय ट्रान्झॅक्शनवर ४ हजार रुपयाचा अतिरिक्त ऑफ दिला जात आहे. ईएमआय वर नो कॉस्ट ईएमआय द्वारे पेमेंट केल्यास दर महिन्याला ४ हजार १६७ रुपये द्यावे लागतील. तर स्टँडर्ड ईएमआय अंतर्गत पेमेंट केल्यास ३६ महिन्यापर्यंत १ हजार ७०९ रुपये द्यावे लागतील.

एक्सचेंज ऑफर

जर तुम्हाला जुना टीव्ही एक्सचेंज करायचा असेल तर तुम्हाला ११ हजार रुपयांपर्यंत ऑफ मिळू शकतो. संपूर्ण व्हॅल्यू मिळाल्यानंतर हा टीव्ही ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. यासाठी जुन्या टीव्हीची कंडीशन चांगली असायला हवी.

वाचाःअर्ध्या किंमतीत खरेदी करा Infinix 32 Inch Smart TV, आजच करा ऑर्डर

iFFALCON टीव्हीचे फीचर्स
या टीव्हीत Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube ला सपोर्ट करतो. हा गुगल टीव्ही आहे. यात ६५ इंचाचा स्क्रीन सोबत Ultra HD (4K) 3840 x 2160 डिस्प्ले दिला आहे. याचा साउंड आउटपूट 24W आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे.

वाचाःJio : गुड न्यूज! आता तब्बल २,६९१ शहरांमध्ये मिळणार 5G ची सुविधा, तुमच्या शहराचं नाव कसं चेक कराल?

Source link

65 inch Smart TV65 inch smart tv priceCheapest 65 inch Smart TVCheapest smart tviFFALCON by TCL LED Smart Google TVस्वस्त स्मार्ट टीव्ही
Comments (0)
Add Comment