नवी दिल्ली:Jio Unlimited Calling Pack : देशात सर्वात आधी आणि सर्वात जास्त 5G चं जाळं पसरवणारी नेटवर्क कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ. जिओ ही सध्याच्या घडीला आघाडीची मोबाईल नेटवर्क कंपनी असून त्यांचे ग्राहक दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या Jio च्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांसाठी बरेच चांगले पर्याय आहेत, पण जर तुम्ही यापैकी सर्वोत्तम पर्याय शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या वैधतेसह मजबूत फायदे मिळतील, तर तोच प्लॅन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या प्लॅनमध्ये, तुम्हाला चांगली व्हॅलेडिटी तर मिळणारच आहे तसंच इतर अनेक फायदे देखील यामध्ये दिले जातील.
तर ज्या प्लॅनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्याची किंमत आहे ७१९ रुपये. यामध्ये ८४ दिवसांची वैधता युजर्सना देण्यात आली आहे. या प्लॅनचा वापर करून जिओ ग्राहक त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतात. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2 GB डेटा वापरण्याची सुविधा दिली जाते म्हणजेच एकूण 168 GB डेटा दिला जातो. वापरकर्ते अमर्यादित 5G डेटा वापरू शकतात. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील दिली जाईल जी ८४ दिवसांसाठी वैध असेल. तसंच यासोबतच यूजर्सना दररोज १०० एसएमएस वापरण्याची सुविधाही दिली जाणार आहे.

म्हणून बेस्ट आहे हा प्लॅन
याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी अशा काही सुविधा मिळतात. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे पाहता हा प्लान तुमच्यासाठी अगदी बेस्ट ठरू शकतो. कारण यामध्ये तुम्हाला सुमारे तीन महिन्यांची वैधता मिळते, ज्यामुळे तुम्हाला सतत रिचार्ज करावा लागणार नाही आणि तुम्ही तीन महिन्यांचा रिचार्ज एकत्रच करु शकता. तसंच कॉलिंगकचं टेन्शन नाही. इंटरनेटही भरपूर मिळत आहेत. आता हे सगळं जाणून घेतल्यावर जर तुम्हाला या रिचार्जचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्ही Jio च्या वेबसाइटवरून हा रिचार्ज करु शकता किंवा इतरवेळी ज्याप्रमाणे रिचार्ज करता अशा कोणत्याही प्रकारे तुम्ही हा रिचार्ज करु शकता.
वाचाःAsus ने लाँच केले ८ नवे लॅपटॉप, प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी खास, पाहा संपूर्ण यादी सविस्तर