1.Cashify.in
जुने फोन विकायचं म्हणाल तर सध्या cashify.in ची सर्वाधिक चर्चा आहे. अगदी सिंपल स्टेप्समध्ये तुम्हाला इथे तुमचा जुना फोन विकता येतो. Cashify.in वेबसाइट व्यतिरिक्त त्यांचं एक मोबाइल अॅप देखील आहे. जेव्हा तुम्ही तुमचा जुना फोन विकायला जाता, तेव्हा सर्वात आधी तुम्हाला फोनचं वय म्हणजेच फोन कधी विकत घेतला आहे ते आणि बॉक्समधील सामग्रीबद्दल विचारले जाते. यानंतर फोनबद्दल विविध माहिती विचारली जाते, काही टेस्ट त्या अॅपमध्येच केल्या जातात. या सर्वानंतर जुन्या फोनसाठी किती पैसे दिले जातील, हे सांगतिले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यावर तुम्ही मान्य केल्यास तुमचा फोन घेण्यासाठी आणि तुम्हाला पैसे देण्यासाठी कॅशिफायचा एजंट घरी येतो. त्याची वेळ आणि ठिकाण तुम्ही शेड्यूल करू शकता. कॅशिफायचे आऊटलेटही आहेत, जिथे तुम्ही फोन विकू शकता.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
2. getinstacash.in
getinstacash.inची सेवा देखील Cashify सारखीच आहे आणि ती देखील तुमच्या घरीपर्यंत येते. ही कंपनीही आधी जुना फोन घेते आणि नंतर पैसे देते. या कंपनीच्या साईटवर तुम्ही स्क्रोल करून तुमच्या फोनच्या स्टेटसबद्दल सर्व माहिती भरु शकता आणि तिथे तुमच्या फोनची किंमत सांगितली जाईल. त्यानंतर तुम्ही पिकअप शेड्यूल करू शकता. यामध्ये कंपनीचा एक्झिक्युटिव्ह येतो आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टींनुसार फोनची स्थिती तपासतो, पैसे देतो आणि फोन घेतो.
वाचाः१६ हजारांचा फोन मिळतोय ६५० रुपयांना, POCO M4 5G वर बंपर डिस्काउंट
3. recycledevice.com
तुम्हाला तुमचा जुना फोन विकायचा असेल तरrecycledevice.comहा देखील चांगला ऑप्शन आहे. विशेष म्हणजे माहितीतुन असं समोर येत आहे की, इतर वेबसाइटच्या तुलनेत याठिकाणी १,००० रुपये अधिक मिळत आहेत. दरम्यान या साईटवर जुना फोन विकण्याची प्रक्रिया जवळपास कॅशिफायसारखीच आहे. साईटवर गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला फोनच्या स्थितीबाबत काही प्रश्न विचारले जातील आणि शेवटी त्याची किंमत सांगितली जाईल. यानंतर तुम्ही तुमचा फोन पिकअप शेड्यूल करू शकता.
4. sellncash.com
तुम्ही तुमचा फोन विकत असाल, तर तुम्ही एक-दोन नव्हे तर चार-पाच वेबसाइटवर फोनची किंमत तपासू शकता. तुम्हाला जिथे जास्त मिळेल तिथे विक्री करा.sellncash.comही एक चांगली मोबाइल ट्रेडिंग वेबसाइट आहे. याठिकाणी तुम्ही तुमचा फोन आणि टॅबलेट विकू शकता. डिव्हाइस विकण्यासाठी, प्रथम तुम्हाला ब्रँड निवडावा लागेल आणि नंतर तुम्ही मॉडेलचे नाव निवडू शकता. यानंतर फोनच्या स्थितीशी संबंधित प्रश्न असतील आणि तुम्ही ती माहिती भरल्यानंतर फोनची किंमत शेवटी सांगितली जाईल. ज्यानंतर तुम्हाला मान्य असल्यास तुम्ही फोन पिकअप सेट करू शकता.
वाचाःAsus ने लाँच केले ८ नवे लॅपटॉप, प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी खास, पाहा संपूर्ण यादी सविस्तर
5. cashonpick.com
cashonpick.comही वेबसाइट देखील जुन्या फोनच्या बदल्यात रोख रक्कम देते. दरम्यान या ठिकाणी देखील फोन विकण्याची पद्धत तीच आहे. जी तुम्हाला कॅशिफाय आणि इतर साईट्सबाबतत सांगितली आहे. येथेही सर्वप्रथम तुमच्या फोनचा ब्रँड किंवा नाव शोधावे लागेल मग फोन मॉडेल निवडा. यानंतर तुमच्या फोनबद्दल काही प्रश्न विचारले जातील. सगळी माहिती भरुन झाली की शेवटी फोनची किंमत सांगितली जाते. त्यानंतर तुम्ही तुमचे पिकअप शेड्यूल करू शकता.