२४ एप्रिल १९७३ रोजी राजापूर येथील मराठी कुटुंबात सचिनचा जन्म झाला. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून रमेश तेंडुलकर यांनी त्याचे ठेवले होते. मोठा भाऊ अजित तेंडुलकरने सचिनला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासोबतच नितीन तेंडुलकर आणि सविता तेंडुलकर ही भावंडे आहेत. सचिन तेंडुलकरने १९९५ मध्ये अंजली तेंडुलकरसोबत लग्न केले. सचिनला सारा आणि अर्जुन ही दोन मुले आहेत.
रमाकांत आचरेकर यांनी सचिनला सक्षम शिक्षण दिले. हॅरिस शील्ड सामन्यात विनोद कांबळीच्या वैयक्तिक ३२६ धावांसोबत त्याने ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केली. आणि वयाच्या १५ व्या वर्षी तो मुंबई संघात सामील झाला होता.
क्रिकेटच्या इतिहासात सचिन रमेश तेंडुलकरची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न हा सन्मान प्राप्त होणारा तो पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २००८ मध्ये सचिनला पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. १९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने फलंदाजीत अनेक विक्रम प्रस्थापित केले.
सचिनने शारदाश्रम विद्यामंदिरात शिक्षण घेतले. तिथे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेट जीवनाला सुरुवात केली. वेगवान गोलंदाज होण्यासाठी तो एम.आर.एफ. पेस फाउंडेशनच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाला होता, परंतु तेथे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक डेनिस लिली यांनी त्याला पूर्णपणे आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केल्याने सचिनचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे तो जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकला. कमी शिक्षण घेता आल्याची खंतही त्याने अनेकदा बोलून दाखविली आहे. असे असले तरी त्याने क्रिकेट क्षेत्राला आपले सर्वस्व मानले आणि प्रामाणिकपणे मेहनत करीत राहीला.