धक्कादायक! ७ वर्षाच्या मुलीने गिळला लोखंडी खिळा, १५ दिवसांनी स्कॅन केल्यानंतर डॉक्टरही हादरले

हायलाइट्स:

  • ७ वर्षाच्या मुलीने गिळला लोखंडी खिळा
  • १५ दिवसांनी स्कॅन केल्यानंतर डॉक्टरही हादरले
  • शरीरात अशा ठिकाणी अडकला की डॉक्टरही थक्क

बीड : लहान मुलांनी खेळता खेळता नाणं किंवा इतर घरातल्या लहान वस्तू तोंडात घातल्याच्या अनेक धक्कादायक घटना आपण पाहिल्या असतील. बीडमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. एका सात वर्षीय मुलीने खेळता खेळता लोखंडी खिळा गिळल्याचा प्रकार घडला आहे. खिळा गिळून बऱ्याच दिवसांनी जेव्हा चिमुकलीला त्रास होऊ लागला तेव्हा ही धक्कादायक बाब समोर आली.

डॉक्टरांकडे तपासणी केली असता मुलीच्या छातीत डाव्या बाजूला खिळा अडकला असून त्या ठिकाणी इन्फेक्शन झाल्याचं समोर आलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण होतं.
दुचाकीवर नेत होता जंगली डुक्कर, गाडी सुरू असताना डुक्कराने असं काही केलं की जागीच मृत्यू
गेल्या १५ दिवसांआधी चिमुकली बाहेर खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने खेळता-खेळता लोखंडी खिळा गिळला. याबद्दल तिने कोणालाही माहिती दिली नाही. पण काही दिवसांनी छातीमध्ये डाव्या बाजूला फुफ्फुसात दुखायला लागलं. यामुळे तिने घरच्यांना सांगितलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या डाव्या फुफ्फुसांमध्ये खिळा अडकल्यामुळे इन्फेक्शन झाले होते.

तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. यामुळे रुईकर हॉस्पिटलमध्ये तिला तातडीने दाखल करण्यात आलं आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करत छातीतील लोखंडी खिळा काढण्यात आला. डॉक्टरांनी तातडीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे मुलगी थोडक्यात बचावली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पालकांनी अशा घटना टाळण्यासाठी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि लहान मुलाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे हीच बाब पुन्हा एकदा समोर आली आहे.
प्रताप सरनाईक यांना त्रास देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलं थेट आव्हान; म्हणाले…

Source link

beed newsbeed news marathibeed news todaybeed news today livebeed news today marathigirl swallowed iron nailmaharashtra news today live in marathi
Comments (0)
Add Comment