सद्यस्थितीला जर तुम्ही ऑफलाइन स्टोअरमधून iPhone 14 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तसं करणं अधिक फायद्याचं नसेल. कारण तुम्हाला Amazon आणि Flipkart वरील ऑनलाइन साईटवर या स्टोअरपेक्षा जास्त सूट मिळेल. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि क्रोमा सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर iPhone 14 च्या बेस व्हेरिएंटची किंमत ७१,९९९ रुपये आहे. तर या स्मार्टफोनची मूळ किंमत ७९,९९० रुपये आहे. स्टोअरमध्ये हीच मूळ किंमत ठेवण्यात आली आहे. तसंच वरील ऑनलाईन तिन्ही वेबसाइटवर तुम्हाला HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर अधिकची ४,००० रुपयांची सूट दिली जात आहे. तसंच जर एक्सचेंजचं म्हणाल तर Amazon वर २२,७०० रुपयांची सूट असून फ्लिपकार्टवर निवडक मॉडेल्सवर २९,२५० रुपयांपर्यंतची सूट देण्यात आली आहे. Croma वर एक्सचेंज डिस्काउंट देखील दिलं जात आहे. त्यामुळे स्टोअरच्या तुलनेत ऑनलाईन साईटवर अधिक स्वस्त फोन आहे. त्यातील त्यात सध्यातरी फ्लिपकार्टवर बेस्ट प्राईस दिली जात आहे.
फ्लिपकार्टवर फार स्वस्तात मिळवू शकता iPhone 14
आयफोन १४ ची फ्लिपकार्टवर किंम ७१,९९९ रुपये असून तुमचं HDFC कार्ड असल्यास तुम्हाला ४,००० अधिकची सूट मिळेल. तसंच एक्सचेंज फोन जर दमदार स्थितीत आणि चांगलं मॉडेल असेल तर २९,२५० असं डिस्काउंट मिळेल. ज्यामुळे फोन अगदी ३८ ते ३९ हजारांच्या दरम्यान मिळू शकतो. एकंदरीत, जर तुम्ही आत्ताच iPhone 14 घेण्याचा विचार करत असाल, तर तो फ्लिपकार्टवरून खरेदी करा कारण ते तुमचे खूप पैसे वाचवू शकते.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा