OnePlus Nord CE 3 Lite 5G
प्रिमीयम स्मार्टफोन कंपनी वनप्लसने नुकताच हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. तसंच यामध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा आणि दोन 2MP कॅमेरे देण्यात आले आहेत. याशिवाय जर फ्रंट कॅमेरा म्हणाल तर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय इतरही दमदार फीचर्स या फोनमध्ये दिले असून या स्मार्टफोनची किंमत केवळ १९,९९९ आहे. ब्रँड आणि फीचर्सच्या तुलनेत ही किंमत फारच बजेटमध्ये आहे.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?
Realme 10 Pro 5G
बजेट स्मार्टफोन्स बनवण्यात सध्या आघाडीवर असणारी कंपनी रिअलमीने आणखी एक बजेट फोन बाजारात आणला आहे. realme 10 Pro 5G हाच स्मार्टफोन असून यामध्ये तब्बल 5000 mAh बॅटरी, 108MP प्राथमिक कॅमेरा आणि दोन 2MP चे कॅमेरे आहेत. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोर 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनची किंमत १८,९९९ रुपये इतकी आहे.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा
Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G
या यादीत शाओमी कंपनीचा Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G हा फोन असून या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 108MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2 MP पोर्ट्रेट लेन्स मिळणार आहे. तसंच सेल्फी घेण्यासाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत २०,९९९ रुपये आहे. तसंच फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटचा सपोर्ट आहे.
वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
Samsung Galaxy M53 5G
Samsung Galaxy M53 5G हा सॅमसंगचा स्मार्टफोन देखील या यादीत आहे. हा फोन कॅमेऱ्यासाठी अगदी खास आहे. कारण या फोनमध्ये तुम्हाला मागील बाजूस चार कॅमेरे मिळतात, ज्यामध्ये एक 108MP मुख्य कॅमेरा, दुसरा 8MP आणि दोन 2MP कॅमेरे आहेत. समोरच्या बाजूला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत म्हणाल तर २०,९९९ रुपये इतकी आहे.
वाचा :जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी
Realme 9
रिअलमी कंपनीचा Realme 9 हा आणखी एक स्मार्टफोन या यादीत असून या स्मार्टफोनची किंमत १६,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी मिळणार आहे. तसंच 16MP फ्रंट कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोनच्या मागील बाजूस 108MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP तिसरा कॅमेरा आहे.
वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर