ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Narayana murthy about ChatGPT : सध्याच्या डिजीटल युगात आता AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. आता बऱ्याच कंपन्या आपआपलं AI सॉफ्टवेअर लॉन्च करत आहेत. पण सध्यातरी प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी OpenAI ने बनवलेल्या चॅट जीपीटी (ChatGPT) याचीच चर्चा होतोना दिसत आहे. दरम्यान हेच ChatGPT भविष्यात हजारो नोकरदारांची नोकरी खाणार असं भाकित केलं जात आहे. पण कितीही काही झालं तरी ChatGPT पेक्षा मानवी मेंदूच अधिक फायदेशीर आणि तल्लख असणार असं विधान इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केलं आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत इन्फोसिसचे अध्यक्ष मूर्ती म्हणाले, ‘मानवी मेंदू हे सर्वात शक्तिशाली संकल्पना यंत्र आहे आणि जगात असे काहीही नाही जे त्याला मागे टाकू शकेल.’ मूर्ती पुढे म्हणाले, “ज्ञान वाढवण्यासाठी, निबंध लिहिण्यासारखी काही कामे करण्यासाठी ChatGPT हा एक उत्तम अतिरिक्त पर्याय आहे. पण मानवी मेंदूने केलेलं काम हे कधीही सरसच असणार आहे.” दरम्यान सध्यातरी ChatGPT च्या वाढत्या लोकप्रियतेच्या दरम्यान, तंत्रज्ञानाविषयी जगभरात चर्चा सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठेतील नोकऱ्या कमी होतील आणि मानवी नोकऱ्यांची जागा ChatGPT घेईल, अशी भीती आहे. पण इन्फोसिसचे मूर्ती यांनी मात्र आपल मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही अलीकडेच AI चा समाजावर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली होती. ChatGPT सारख्या AI तंत्रज्ञानासाठी सर्वांनी हळूहळू एकत्रितपणे तयार होण्याची गरज आहे. AI तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासाच्या परिणामाबद्दल बोलताना पिचाई यांनी हे देखील म्हणाले होते की, AI द्वारे पसरवलेली चुकीची माहिती आणि खोट्या बातम्या ही आगामी काळात मोठी समस्या ठरु शकते.

ChatGPT ची सर्वत्र हवा
आता जर या ChatGPT बद्दल बोलायचं झालं तर, या टूलने फार कमी कालावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या प्रणालीमुळे कोणताही कंटेट अर्थात मजकूर काही मिनिटांत आपल्याला लिहून मिळतो. तसंच ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, ट्रान्सलेशन अशी कितीतरी काम काही मिनिटांत ChatGPT करु शकते. नोव्हेंबर 2022 मध्ये AI चॅटबॉट लाँच झाल्यापासून, आता अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये AI ऑफर करत आहेत आणि जगभरात एक खळबळ उडाली आहे. Google, Snapchat, Facebook आणि Twitter अशा काही कंपन्या आहेत ज्यांनी ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या AI टूल्सची घोषणा केली आहे.

वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

Source link

ChatGPTchatgpt newsinfosysinfosys foundernarayana murthyचॅट जीपीटीनारायण मूर्ती
Comments (0)
Add Comment