चीन टाकणार आता ‘पुढचं पाऊल’, या निर्णयाने अमेरिकेला भरली धडकी, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीःजगभरात 5G टेक्नोलॉजीची चर्चा सुरू आहे. जगातील काही देशात 5G सर्विस सुरू करण्यात आली आहे तर भारतातील काही प्रमुख शहरात ही सर्विस उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु, चीनने आता यापुढचं पाऊल टाकण्याचं ठरवलं आहे. चीननं पुढच्या जनरेशनवर केंद्रीत केलं आहे. परंतु, 5G सोबत हाय स्पीड इंटरनेटची सुविधा मिळते. जी 4G च्या तुलनेत २० पट जास्त वेगवान आहे. परंतु, 6G वायरलेस इंटरनेट, हाय स्पीड इंटरनेट सर्व रेकॉर्ड मोडणार आहे.

6G वायरलेस इंटरनेटने स्पीड, लेटेंसी, स्पेक्ट्रम, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, सिक्योरिटी आणि उर्जा दक्षतेमध्ये जास्त अडवान्स्ड असू शकते. अनेक देशात अजून 5G नेटवर्कसाठी संघर्ष केला जात आहे. परंतु, असा दावा केला जात आहे की, चीन लवकरच 6G वायरलेस नेटवर्कला लाँच करू शकते. लेटेस्ट रिपोर्टनुसार, चीन अल्ट्रा-फास्ट वायरलेस इंटरनेटची टेस्टिंग सुद्धा करीत आहे. याची डाउनलोड स्पीड 100Gbps आहे. म्हणजेच ही स्पीड 5G नेटवर्कच्या तुलनेत अनेक पट जास्त आहे.

चीनच्या निर्णयाने अमेरिकेला भरली धडकी
६जीसाठी अनेक देशाचे प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेच्या आधी चीनमध्ये ही सर्विस सुरू झाल्यास अमेरिका मागे पडेल, अशी चिंता अमेरिकेला सतावत आहे. शुक्रवारी व्हाइट हाउसने पुढचे जनरेशनचे वायरलेस कनेक्टिविटीवर चर्चा करताना इंडस्ट्रीजच्या लीडर्स सोबत चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेतली. अमेरिकेला सर्वात जास्त चिंता ही चीनची आहे.

वाचाःiPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

चायना एयरोस्पेस सायन्स एंड इंडस्ट्रीची दुसऱ्या अकादमीच्या २५ व्या संस्थेने पहिल्यांदा टेरा हर्ट्ज (THz) आवृत्ति लेवल वर एक यशस्वी वायरलेस ट्रान्समिशनची माहिती दिली आहे. ज्याने 100 Gbps ची डेटा स्पीड मिळवली आहे. म्हणजेच अमेरिकेच्या 1Gbps वर चालणाऱ्या G सिग्नल पेक्षा कितीतरी पट जास्त वेगवान आहे. अमेरिका सरकारने ६जी रिसर्चसाठी १ अब्ज डॉलर ठेवले आहे. परंतु, हे स्पष्ट नाही की, हे चीनच्या पुढे जाण्यासाठी ऑप्शन असेल की नाही.

वाचाःSmartphone Offer : 5G ची सुविधा तसंच १०८ मेगापिक्सलचा कॅमेराही, ‘हे’५ बजेट फोन आहेत अगदी बेस्ट

Source link

6G Network china6g network in india6g network launch date6g network mobile phone6g network speed​6G Network
Comments (0)
Add Comment