तर 8GB रॅम 128GB स्टोरेजसह येणाऱ्या या Samsung galaxy z flip 4 फोनची किंमत ८९,९९९ रुपये इतकी आहे. फोन विकत घेताना तुम्ही HDFC बँकेचं कार्ड वापरत असाल तर आणखी ७ हजार रुपयांचं डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. तसंच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करत असाल तर तुम्हाला आणखी ४१, ३९० रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे जर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर या दोन्हीचा लाभ घेतला तर तुम्ही जवळपास ४८,००० वाचवू शकता.
Galaxy Watch 4 Classic मिळेल ३ हजारांना
पण या ऑफरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणाल तर तुम्ही एक्सचेंज करत असणारा तुमचा जुना फोन हा चांगल्या कंडीशनमध्ये असणं गरजेचं आहे. कारण एक्सचेंज ऑफरमधील संपूर्ण सूट तुम्हाला मिळवायची असल्यास तुमच्या जुन्या फोनचं मॉडेल आणि त्याची स्थिती दोन्हीही दमदार हवं तरच तुम्हाला इतकी मोठी सूट मिळू शकते. विशेष म्हणजे कंपनीकडून आणखी एक भारी ऑफर या फोनसोबत देण्यात येत आहे, ती म्हणजे हा फोन विकत घेतल्यास तुम्हाला सॅमसंगची लेटेस्ट Galaxy Watch 4 Classic ही ३१,९९९ रुपयांची स्मार्टवॉच अवघ्या २,९९९ रुपयांना विकत घेता येणार आहे.
Samsung galaxy z flip 4 चे फीचर्स
सॅमसंगचा हा फोन सर्व लेटेस्ट फीचर्ससह कंपनीने तयार केला आहे. यामध्ये 8GB रॅम 128GB स्टोरेज असून डिस्प्लेही अगदी भारी आहे. 2460×1080 पिक्सेल रेज्युलेशनसह ६.७ इंचेसचा Full HD+ Dynamic Amoled 2X मेन डिस्प्ले कंपनीने दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. तसंच हा फ्लिप फोन असल्याने यात दुसरा डिस्प्लेही असून तो १.९ इंचेसचा आहे. हा देखील सुपर AMOLED 260×512 पिक्सेल रेज्युलेशनसह देण्यात आला आहे. जर फोनच्या प्रोसेसरचं म्हणाल तर हा ऑक्टा कोर प्रोसेसर असून याच फोटोग्राफीसाठी १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आणि १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये बॅटरी ही 3700mAh इतकी देण्यात आली आहे.
वाचा :Smartphone Offer : 5G ची सुविधा तसंच १०८ मेगापिक्सलचा कॅमेराही, ‘हे’५ बजेट फोन आहेत अगदी बेस्ट