Google Play Store Down: ‘ही’ समस्या येत असल्याने यूजर्संकडून तक्रारीचा पाऊस

Google Play Store Down : ॲन्ड्रॉईड स्मार्टफोनसाठी ॲप्स डाउनलोड करण्याकरता असणारं अधिकृत ॲप स्टोअर म्हणजेच गुगल प्ले स्टोर. पण हेच प्ले स्टोर तांत्रिक अडचणींमुळे योग्यप्रकारे काम करत नसल्याचं दिसून आलं. जगभरातील अनेक वापरकर्ते प्ले स्टोअर वापरू शकत नसल्याचं दिसून आलं आहे. गुगल प्ले स्टोअरचं ॲप आणि वेब व्हर्जन दोन्ही काही काळापासून बंद असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे Downdetector प्लॅटफॉर्मवर, २,५०० हून अधिक वापरकर्त्यांनी सेवा खंडित झाल्याच्या तक्रारी देखील नोंदवल्या आहेत. सध्या या समस्येबाबत गुगलकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.

वाचा :जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, प्ले स्टोअरमधील ही समस्या काही निवडक वापरकर्त्यांना आली आहे. म्हणजेच, काही वापरकर्ते प्ले स्टोअरमध्ये प्रवेश करु शकत आहेत तसंच ॲप्स देखील डाउनलोड करु शकत आहेत.तर दुसरीकडे काहींना प्ले स्टोरच्या मोबाइल ॲपवरच नाही तर वेब ब्राउझर अशा दोन्हीवर प्ले स्टोअर चालवण्यास समस्या येत आहे. त्याचप्रमाणे, काही वापरकर्ते प्ले स्टोअरच्या माय अॅप्स विभागात जाऊन फोनवर प्री-इंस्टॉल केलेले अॅप्स अपडेट करू शकत आहेत. तर काही जण Google Play Store च्या मेन पेजवर प्रवेश करण्यासही सक्षम नाहीत. काहीजणांनी फोन रिस्टार्ट करुन प्ले स्टोरमध्ये प्रवेश केला असून सर्वांना मात्र असं करणं शक्य झालेलं नाही. अनेकांनी आपल्या तक्रारी ट्विट देखील केल्या आहेत.

वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Source link

google play storegoogle play store newsplay store downगुगलगुगल प्ले स्टोरप्लेस्टोर
Comments (0)
Add Comment