तुमच्या आधार कार्डला १० वर्षे झालीत?, १४ जूनपर्यंत फ्री मध्ये करा आधार अपडेट, नंतर मोजावे लागणार पैसे

नवी दिल्लीःAadhaar Update: सध्या आधार कार्ड डॉक्यूमेंट्स खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामांसाठी आधार कार्डची विचारणा केली जात आहे. तुमचे १० वर्ष जुने आधार कार्ड झाले असेल तर त्याला अपडेट करणे गरजेचे आहे. सरकारकडून सुरक्षेसाठी १० वर्ष जुने आधार कार्डला अपडेट करण्यास सांगितले जात आहे. परंतु, जर तुम्ही १० वर्षात एकदा जरी आधार कार्ड अपडेट केले असले तरी तुम्हाला आधार कार्डला अपडेट करण्याची गरज नाही.

फ्री मध्ये करा अपडेट
सरकारकडून आधार अपडेट करण्यासाठी फी भरण्यास फ्री केले आहे. ही सुविधा १५ मार्च ते १४ जून पर्यंत जारी राहणार आहे. तुम्हाला १४ जून पूर्वी आधारला अपडेट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला १४ जून नंतर आधार अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकते.

वाचाःNothing Phone (1) च्या किंमतीत पहिल्यांदा इतकी बंपर सूट, पाहा ऑफर

कसे कराल आधार अपडेट
आधार कार्डला अपडेट करण्यासाठी यूजर्सला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ अॅड्रेस द्यावा लागतो. या दोन्ही डॉक्यूमेंटला myaadhaar.uidai.gov.in वर अपलोड करावे लागते. सध्या ही सुविधा फ्री ऑफ कॉस्ट आहे.

आधार अपडेट करण्याची संपूर्ण प्रोसेस

  • सर्वात आधी तुम्हाला मोबाइल किंवा लॅपटॉप वरून UIDAI च्या वेबसाइटवर जावे लागेल.
  • यानंतर आधार नंबर टाकावा लागेल.
  • नंतर ओटीपी व्हेरिफिकेशनवरून लॉगिन करावे लागेल.
  • नंतर डॉक्यूमेंट अपडेट वर क्लिक करून व्हेरिफाय करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफची कॉपी अपलोड करावी लागेल.
  • याप्रमाणे आधार अपडेटची रिक्वेस्ट सबमिट होईल. तसेच आधार स्टेट्स अपडेट मिळेल.

नोटःआधारला ऑनलाइन फ्री अपडेट केले जाऊ शकते. याशिवाय, जवळच्या आधार स्टोर किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आधारला अपडेट करता येऊ शकते.

वाचाःफोन चोरीला गेल्यावर बँक डिटेल्स कसे वाचवाल? या स्टेप्स करा फॉलो नाहीतर होईल नुकसान

Source link

Aadhaar Updateaadhaar update facilityaadhaar update feesAadhaar Update freeaadhaar update onlineaadhaar update status
Comments (0)
Add Comment