काही काळापूर्वी याच इअरबड्सची किंमत खूप जास्त असायची. पण आता तुम्हाला अगदी हजार रुपयांमध्ये चांगले इअरबड्स मिळतील. पण कानात मळ आणि आजूबाजूची धूळ अडकल्याने इअरबड लवकर खराब होतात, त्यामुळे आवाजही नीट येत नाही. हे इअरबड्स साफ करणंही खूप अवघड आहे, कारण स्पीकर्सची जाळी तुटण्याची भीती आहे. पण काही टिप्स आहेत, ज्याद्वारे तुम्ही घरी बसल्या बसल्या इअरबड्स स्वच्छ करू शकता.
अशा प्रकारे बाहेरुन स्वच्छ करा
तुम्ही मायक्रोफायबर कापड वापरून TWS इअरबड्स हलक्या हाताने साफ करू शकता. तुम्ही ते एकावेळी एक इअरबड स्वच्छ केले पाहिजे आणि नंतर त्याच प्रकारे चार्जिंग केस स्वच्छ करा. यानंतर, तुम्ही इअरबड्स घासण्यासाठी मऊ ब्रश वापरू शकता. अशाप्रकारे तुम्ही इअरबड सुरक्षितपणे स्वच्छ करु शकता आणि सर्व घाण काढून टाकू शकता.
कापूस वापरा
इअरबड्सची आतील बाजू स्वच्छ करण्यासाठी कापूस वापरणं जास्त फायद्याचं आहे. कापूस वापरताना साफ करण्यासाठी अल्कोहोल थोडक्यात काय तर सॅनिटायजर वापरु शकता. स्वच्छ करताना आपल्याला कापसावर थोडासा दाब लावावा लागेल आणि हळूवारपणे पुसून टाकावे लागेल. याव्यतिरिक्त, ज्याठिकाणी आवाज येण्यासाठी होल असतो, ती बाजू नीट आतून साफ करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा ब्रश वापरता येईल. तसंच किंचित ओलसर कापडाने तुम्ही पुसूही शकता.
इअरटिप्स काढा आणि स्वच्छ करा
इअरबड्समधील बहुतेक घाण ही इअरटिप्समध्ये असते. त्यामुळे त्या इअरटिप्स बाहेर काढून त्याला कापडाने आणि सॅनिटायझरने पूर्णपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे.
वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधा