सर्वात स्वस्त प्लॅन तोही 100mbps च्या स्पीडसह
तर कंपनीचा सुरुवातीचा ब्रॉडबँड प्लान हा ४९९ प्रतिमहिना असून यात 100mbps ची स्पीड आणि अनलिमिटेड डेटा देखील मिळतो. तर नेटप्लस कंपनीचा हा एंट्री लेवल प्लान मार्केटमधील इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी किंमतीत आणि अधिक फायद्यांनी येत आहे. जर इतर कंपन्यांच्या प्लानचा विचार केला तर या ४९९ रुपयांच्या किंमतीत कंपन्या 40mbps स्पीड असणारे प्लान देतात. त्यामुले नेटप्लस कंपनीच्या मते त्यांचे प्लान्स हे डबल स्पीड देणारे आहेत.
नेटप्लसच्या इतर प्लान्सचा विचार केला तर ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ महिन्यासाठी 100mbps ची स्पीड आणि अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळते. याशिवाय ५९९ रुपयांमध्ये १ महिन्यासाठी 150mbps ची स्पीड आणि अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळते. तसंच ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ महिन्यासाठी 200mbps ची स्पीड आणि अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळते. याशिवाय ७९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ महिन्यासाठी 250mbps ची स्पीड आणि अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळते.
कंपनीचे खास एन्टरटेनमेंट प्लॅन्स
कंपनीच्या काही खास प्लान्समध्ये OTT सेवाही उपलब्ध आहेत. यामध्ये ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये 150mbps स्पीडसह अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग उपलब्ध आहे. यामध्ये १४ फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन मिळत आहेत. ज्यामध्ये सोनी लिव, जी५ प्रिमीयम, डिस्कवरी प्लस, शेमारु, इरॉस नाऊ, अल्ट बमा म्यूझिक, एपिक ऑन, गाना आणि इतर काही अॅप्सचे सब्सक्रिप्शन्स आहेत. या ओटीटी सेवा १२९९, १४९९ आणि ३९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील मिळत आहेत. या प्लॅन्समध्ये नेटची स्पीड अनुक्रमे 500mbps, 600mbps आणि 1000mbps अशी आहे.
‘या’ ७ राज्यात उपबल्ध आहे नेटप्लस
आता सद्यस्थितीला नेटप्लस भारतातील सात राज्यात उपलब्ध आहे. यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या शहरांचा समावेश आहे. या सात राज्यातील ४०० हून अधिक शहरांत नेटप्लसची सेवा उपलब्ध आहे.
वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर