बुध ग्रह मेष राशीत अस्त झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध बलवान असल्यास व्यक्तीचे आरोग्य चांगले असते आणि बुद्धी तीक्ष्ण असते. बुध ग्रहाचे अस्त होणे अर्थव्यवस्था, करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत अनेक राशींवर परिणाम कारक ठरेल. बुधाच्या अस्तामुळे मे महिन्याच्या मध्यापर्यंत, वृश्चिक व्यतिरिक्त, इतर अनेक राशीच्या लोकांना आर्थिक समस्या, करियर आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी बुध ग्रहाचे संक्रमण प्रतिकूल असेल.