मागील काही महिन्यांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) चर्चा सर्वत्र होत आहे. OpenAI कंपनीच्या ChatGPT प्रणालीने तर सर्वत्रच हवा केली आहे. हव्या त्या प्रश्नांची उत्तर तसंच वेगवेगळी टास्क एका क्लिकवर होत आहेत. याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने बनलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. कधी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेले प्रभू रामाचे चित्र व्हायरल होते तर कधी ताजमहाल बांधताना कसा असावा याचे हे चित्र समोर येते. असाच एक व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे.
वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं
आनंद महिंद्रा यांनी शेअर केला Video
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसने एका ५ वर्षाची मुलगी वयानुसार कशी दिसू लागते हे दाखवलं आहे. यात ५ वर्षांपासून ते ९५ वर्षांपर्यंत काळानुसार ती कशी दिसते हे दिसत आहे. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही हैराण झाले आहेत. आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मला एक व्हिडिओ मिळाला आहे. यामध्ये ५ वर्षाच्या मुलीचे पोट्रेट बनवण्यात आले आहे. ही मुलगी बघता बघता ९५ वर्षांची वृद्ध महिला झाली आहे. ही आर्टिफिशियल इंटेलिजेंसची शक्ती खरंच आश्चर्यकारक आहे.” यावर नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देत असून एकाणे लिहिले आहे की, ज्या प्रकारे AI बदलत आहे. त्याला समजणे कठीण होईल. चित्रे काढण्यापासून पुस्तके लिहिण्यापासून ते गाणी लिहिण्यापर्यंत, भविष्य पूर्णपणे AI चालित असेल. दर आठवड्याला येणारी नवीन साधने त्याला अधिक शक्ती देत आहेत. तर एकाने लिहिले आहे, ‘हे सुंदर आहे परंतु आपण सर्वजण वास्तविक जगापासून वेगळे झालो आहोत याचा अतिरेक करू नये.’
पाहा खास VIDEO-
वाचाः१६ हजारांचा फोन मिळतोय ६५० रुपयांना, POCO M4 5G वर बंपर डिस्काउंट