JioCinema वर फ्री आयपीएल पाहताय? आता पैसे मोजावे लागणार, समोर आली महत्त्वाची माहिती

Jio Cinema soon to become paid Service : आयपीएल २०२३ स्पर्धा थाटामाटात सुरु आहे. एकापेक्षा एक चुरशीचे सामने दररोज होत आहेत. त्यात जिओ सिनेमा या अॅपवर प्रत्येकासाठी आयपीएलचे सामने फ्री मध्ये उपलब्ध असल्याने सर्व क्रिकेटप्रेमी आणखीच आनंदी असल्याचं दिसून येत आहे. क्रिकेटप्रेमी भरभरुन मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. याआधी Fifa World Cup 2022 Qatar स्पर्धा देखील फ्री मध्ये पाहण्याची मजा युजर्सनी घेतली होती. पण आता ही सर्व फ्री ची मजा लवकरच बंद होणार आहे. कारण जिओ सिनेमा हे अॅपदेखील लवकरच सब्सक्रिप्शन घेऊन पाहावं लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला जिओवर सिनेमा, सामने किंवा काहीही पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. नव्याने समोर आलेल्या रिपोर्ट्समधून ही माहिती समोर येत आहे.

तीन प्लॅन्समध्ये येणार सब्सक्रिप्शन

जिओ सिनेमाचं सब्सक्रिप्शन तीन वेगवेगळ्या प्लान्समध्ये येणार असं समोर येत आहे. पण हे सब्सक्रिप्शन नेमकं कधीपासून लागू होणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण जिओसिनेमा लवकरच पेड सर्व्हिस होणार हे मात्र जवळपास निश्चित झालं आहे. सध्या आयपीएल २०२३ सुरु असून या सीजनच्या दरम्यानच हे प्लान्स लागू होणार आहेत की स्पर्धा संपल्यावर हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

​वाचाःफास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

Reddit वर व्हायरल झाली माहिती

तर जिओ प्लान्सचे हे स्क्रिनशॉट्स Reddit या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते. यातील माहितीनुसार जिओ सिनेमाचं सब्सक्रिप्शन तीन वेगवेगळ्या प्लान्समध्ये येईल, ज्यामध्ये गोल्ड, डेली आणि प्लॅटिनम असे पर्याय उपलब्ध असतील. व्हायरल स्क्रिनशॉट्समध्ये लिहिलं आहे की,’संपूर्ण कंटेट कोणत्याही डिव्हाईसवर सगळ्यात चांगल्या क्वॉलिटीमध्ये पाहण्याचा पर्याय Jio Cinema च्या प्रिमीयम प्लान्ससोबत’ पण या सर्व प्लान्सची अधिकृत माहिती कंपनीने अजूनही शेअर केलेली नाही.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

एका दिवसासाठीचाही आहे प्लान

तर लीक झालेल्या माहितीनुसार तीन वेगवेगळे रिचार्ज प्लान्स समोर आले आहेत. यातील द डेली डिलाइट प्लानमध्ये फक्त एका दिवसासाठी जिओ सिनेमाचा एक्सेस मिळणार आहे. त्यामुळे एखाद्याला केवळ एकच मॅच पाहायची असेल तर तो एका दिवसांचा रिचार्ज करु शकतो. ज्याची किंमत असेल फक्त २९ रुपये. एकावेळी दोन डिव्हाईसवर या प्लॅनमध्ये स्ट्रिमिंगची मजा घेता येईल. दुसरा प्लान आहे, द गोल्ड स्टंडर्ड. या प्लानची किंमत २९९ रुपये असून याची व्हॅलिडिटी ३ महिन्यांची आहे. सुरुवातीला कंपनी हा प्लान ९९ रुपयांच्या किंमतीत आणू शकते पण पुढे याची किंमत वाढू शकते.

​​वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर

​एक वर्षासाठीचा रिचार्ज ५९९ रुपये

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीतून सर्वात महाग जिओ सिनेमाचा रिचार्ज हा ५९९ रुपये किंमतीचा आहे. पण किंमतीप्रमाणे याची व्हॅलिडिटीही दमदार आहे. ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष इतकी याची वैधता आहे. यामध्ये अॅड फ्री स्ट्रिमिंग असू शकते. तसंच या प्लॅनमध्ये एकावेळी चार वेगवेगळ्या डिव्हाईसेस मध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगची मजा युजर्सना घेता येणार आहे.

​​वाचा :जबरदस्त कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग! One Plus 10 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट, १७ हजार वाचवण्याची संधी

​’या’ OTT प्लॅटफॉर्म्सशी होणार टक्कर

तर जिओ सिनेमा पेड सब्सक्रिप्शन झाल्यावर त्याची टक्कर सध्याच्या पेड सब्सक्रिप्शन असणाऱ्या हॉटस्टार, अॅमेझॉन, नेटफ्लिक्स यांच्याशी असणार आहे. कारण युजर्सनी जिओ सिनेमाचं सब्सक्रिप्शन घ्यावं यासाठी त्यांना इतरांपेक्षा चांगला कंटेट दाखवावा लागेल. आधी हॉटस्टारवर आयपीएलचं स्ट्रिमिंग कोट्यवधी लोक पाहत होते. पण आता फ्रीमध्ये ही सेवा जिओनं आणल्यावर त्यांना जास्त प्रतिसाद मिळाला पण एकदाका जिओ ही पैसे घेऊ लागल्यावर नेटकऱ्यांची कितपत पसंती मिळेल हे पाहावे लागेल.

​​वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Source link

ipl 2023Jio CinemaJio Cinema paidjio plansott plansआयपीएलजिओ प्लॅन्सजिओ सिनेमा सब्सक्रिप्शन
Comments (0)
Add Comment