नवी दिल्ली :Vodafone Idea (Vi) कंपनीचं भारतातील नेटवर्क तसं स्ट्राँग आहे. काही वर्षांपूर्वी या दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क वेगवेगळे असतानाही त्यांचे ग्राहक मोठ्या प्रमाणात होते. पण जिओच्या एन्ट्रीनंतर हळुहळु इतर कंपन्या मागे पडू लागल्या आहेत. आता देखील जिओ आणि एअरटेलने 5G सेवा सुरू केली असून वोडाफोन आयडियाने अद्याप 5G सेवा आणलेली नाही. मात्र कंपनीच्या म्हणण्यानुसार काम सुरू असून ते लवकरच सुरू होईल. पण तोवर कंपनी नवनवीन प्लान आणून आपल्या ग्राहकांना आनंदी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता Vi ने 6 महिन्यांसाठी सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे, जो खूपच जबरदस्त आहे. या प्लॅनची किंमत ५४९ रुपये आहे. चला तर या प्लानबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
Vi चा ५४९ रुपयांचा हा प्रीपेड प्लान आता देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. या प्लानचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची वैधता अर्थात व्हॅलिडिटी. हा रिचार्ज अशा ग्राहकांसाठी आहे ज्यांना अधिक वैधता मिळवायची आहे आणि डेटाची आवश्यकता देखील अधिक नाही. या रिचार्जमध्ये तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक व्हॉइस कॉलिंग मिनिटासाठी निश्चित दर आकारेल आणि त्यात फक्त 1GB डेटा आहे. या योजनेबद्दल नेमकं जाणून घेऊया.

वाचा:घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन
व्होडाफोन आयडियाचा ५४९ रुपयांचा प्लॅन
Vodafone Idea चा हा ५४९ रुपयांचा प्लान १८० दिवसांच्या सेवेची वैधता सह येतो. या प्लॅनमध्ये एकूण 1GB डेटा उपलब्ध आहे. अतिरिक्त डेटा मिळविण्यासाठी, तुम्हाला डेटा व्हाउचरसाठी सदस्यता घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय तसेच स्थानिक कॉलसाठी 2.5 पैसे/सेकंद दराने शुल्क आकारले जाईल. प्लॅनमध्ये तुम्हाला ५४९ रुपयांचा टॉकटाइम देखील मिळणार आहे. दरम्यान ज्या वापरकर्त्यांना त्यांचे दुसरे सिम सक्रिय ठेवायचे आहे त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम योजना आहे. Vodafone Idea च्या प्रीपेड ऑफरच्या विभागात जाऊन हा रिचार्ज तुम्हाला करता येणार आहे.
वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान