OnePlus Pad च्या किंमतीचा खुलासा, पाहा कधी होणार लाँच, कसा मिळेल स्वस्तात

नवी दिल्लीःOnePlus चा पहिला टॅबलेट OnePlus Pad ला लवकरच भारतात प्री ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. आता अखेर वनप्लस कंपनीने आपल्या पहिल्या टॅबलेटच्या भारतातील किंमतीचा खुलासा केला आहे. वनप्लस पॅडला देशात ३७ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत उपलब्ध करण्यात येणार आहे. ८ जीबी व १२ जीबी रॅम असा दोन ऑप्शन सोबत येणार आहे. वनप्लसच्या या पॅडची किंमत व फीचर्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.

OnePlus Pad Price in India
OnePlus Pad 8GB + 128GB आणि 12GB + 256GB रॅम मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लस पॅड टॅबलेट अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि वनप्लसच्या अधिकृत वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या टॅबलेटची प्री बुकिंग २८ एप्रिल पासून सुरू केली जाणार आहे. या डिव्हाइसला २ मे पासून विक्री साठी उपलब्ध करण्यात येणार आहे. प्री ऑर्डरच्या ग्राहकांना आयसीआयसीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड द्वारे टॅबलेटवर २ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकणार आहे. याच प्रमाणे यूजर्सला टॅबलेटवर १२ महिन्याची नो कॉस्ट ईएमआय प्लान सोबत खरेदी करू शकतात. कंपनी प्रत्येक प्री ऑर्डर सोबत १४९९ रुपयाचा कव्हर फ्री ऑफर करीत आहे.

वाचाःJio च्या या प्लानला करा रिचार्ज, २५२ दिवसांपर्यंत रोज २.५ जीबी डेटासह हे बेनिफिट्स

OnePlus Pad Specifications
OnePlus Pad मध्ये २८०० x २००० पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ११.६१ इंचाचा डिस्प्ले, १४४ Hz रिफ्रेश रेट आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट मिळते. हे डिव्हाइस मीडियाटेक डायमेंसिटी ९००० प्रोसेसर द्वारा संचालित होते. यात १३ मेगापिक्सलचा रियर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग सेल्फी स्नॅपर कॅमेरा दिला आहे. टॅबलेट मध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 9,510mAh ची बॅटरी दिली आहे. डॉल्बी एटमॉस सपोर्ट सोबत क्वॉड स्टिरियो स्पीकर दिला आहे.

वाचाःSmartphone Blast: स्मार्टफोन ठरला जीवघेणा, फोनवर व्हिडिओ पाहताना स्फोट, ८ वर्षीय मुलीचा मृत्यू

Source link

OnePlus Padoneplus pad featuresOnePlus Pad Pre Bookingoneplus pad pre orderoneplus pad priceOnePlus Pad Price in Indiaoneplus pad specifications
Comments (0)
Add Comment