नवी दिल्लीःCaller ID Feature: भारतात लोक वेगाने डिजिटलचा वापर करीत आहेत. फोन पेमेंट, मूव्ही आणि ट्रॅव्हलिंग सारख्या कामासाठी ऑनलाइन सर्विसचा वापर केला जात आहे. त्यामुळे यूजर डेटाला अॅक्सेस करणे सोपे झाले आहे. या डेटाच्या मदतीने यूजर्सला फेक कॉलिंग आणि मेसेजिंग करून त्रास दिला जात आहे. यूजर्सची आता यापासून सुटका केली जाणार आहे. टेलिकॉम कंपनी जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया एक प्लान बनवत आहे. यामुळे फेक कॉलिंग आणि मेसेजिंग वर आळा घालता येणार आहे. यासाठी तिन्ही टेलिकॉम कंपन्यांनी Truecaller सोबत पार्टनरशीप केली आहे.
फेक कॉलपासून मिळेल सुटका
स्पॅम आणि फिशिंगला आळा घालण्यासाठी एआय बेस्ड सोल्यूशन आणले जाणार आहे. याचाच अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने फ्रॉड रोखण्यात येणार आहे. गेल्या वर्षी टेलिकम्यूनिकेशन नेटवर्क्स मध्ये कॉलिंग नेम प्रेजेंटेशन (सीएनएपी) ची माहिती दिली जाणार आहे. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे फोन कॉल आल्यानंतर फोन करणाऱ्यांचे नाव फोटो सोबत दिसेल. याला फोन कॉलर आयडी फीचर नाव दिले आहे. यामुळे फेक कॉलरची ओळख केली जाऊ शकते. परंतु, तिन्ही दूरसंचार कंपन्यांनी गोपनीयता संबंधी चिंतेचा हवाला देत सरकारचा सल्ला फेटाळला आहे. जिओने म्हटले की, प्रत्येक डिव्हाइसवर कॉलर आयडी दिल्यानंतर प्रायव्हसीची चिंता उद्भवू शकते.

वाचाःBattery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो
तिन्ही कंपन्या मिळून आणू शकते सोल्यूशन
त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, मार्केटमध्ये आधीपासूनच जर Truecaller अॅप्स उपलब्ध असेल तर कॉलर आयडी वरून कोणतीही अडचण आली नाही पाहिजे. त्यामुळे Truecaller च्या मदतीने भारतात कॉलर आयडी फीचरला AI च्या मदीतने आणल्यासंबंधी तिन्ही कंपन्या एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, लवकरच यावर काही तरी सोल्यूशन निघू शकते.
वाचाःGaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट