मुंबई– सध्या अनेकांच्या नजरा सलमान खानच्या ईदला प्रदर्शित झालेल्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या कमाईकडे लागल्या आहेत. सलमानच्यामुळेच चित्रपटाने वीकेण्डला कथा कमकुवत असूनही जबरदस्त कमाई केली. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ठरला तो पहिला सोमवार, जेव्हा ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये किती ताकद आहे ते कळणार होते. सोमवारी या सिनेमाने समाधानकारक कमाई केली असली तरी मंगळवारी कमाईत मोठी घसरण झाली आहे. असं असलं तरी येत्या वीकेण्डला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा एक मोठ्या सुट्टीचा वीकेण्ड असणार आहे.सलमान खान, पूजा हेगडे, भूमिका चावला, भाग्यश्री, पलक तिवारी, शहनाज गिल, जस्सी गिल, व्यंकटेश अशा सर्व स्टार्सनी सजलेल्या या सिनेमाची कमाई पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी दुहेरी अंकात येण्याची अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या मंगळवारच्या कमाईचे प्राथमिक आकडे समोर आले आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाने मंगळवारी पाचव्या दिवशी फक्त ६.५ कोटींचा गल्ला जमवला. यामुळे कमाईमध्ये ३० टक्क्यांची घसरण झाली आहे.
सर्वाधिक परिणाम मल्टिप्लेक्सवर झाला
सलमान खानच्या चित्रपटाच्या कमाईवर सर्वाधिक परिणाम मल्टिप्लेक्समध्ये झाल्याचे म्हटले जात आहे. कामाचा दिवस असूनही सोमवारी सिनेमाने भरपूर कमाई केली. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागात सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जास्त कलेक्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, पाच दिवसांत सिनेमाने ७८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. सलमानचा सिनेमा भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात सुमारे ८७-८८ कोटींचा गल्ला गाठेल असे दिसते. शुक्रवार, शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त चित्रपटाला १ मे च्या सुट्टीचाही फायदा मिळू शकतो आणि चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होऊ शकते असे म्हटले जात आहे. सलमान खानच्या या चित्रपटाने सोमवारपर्यंत म्हणजेच चार दिवसांत जगभरात १२६ कोटींहून अधिक कमाई केली आहे.
सलमान खानला पाहून चाहते भारावले, ईद दिवशी कडक सुरक्षेत दबंग बाल्कनीत
Source link