तर कंपनीच्या माहितीनुसार एक युजर आपल्या व्हॉट्सॲप अकाउंटला चार वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये चालवू शकणार आहे. यावेळी सेंकडरी डिव्हाईसमध्ये व्हॉट्सॲप सुरु करण्याकरता युजर्सना एक कुआर कोड स्कॅन करावा लागेल. यावेळी एक ओटीपी बेस्ड ऑथिंटिकेशन सिस्टमही काम करणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग याने एका ऑफिशिअल ब्रॉडकस्टमध्ये या फीचरची घोषणा ही केली आहे. तर याचा सर्वाधिक वापर तेव्हा होईल, जेव्हा तुमच्या फोनची बॅटरी संपून फोन बंद पडत असेल त्यााचवेळी मित्राच्या किंवा तुमच्या सोबत असणाऱ्या विश्वासू व्यक्तीच्या फोनममध्ये व्हॉट्सॲप सुरु शकता.
प्रायमरी फोन महत्त्वाचा
तर कंपनीने साफ माहिती दिली आहे की, जरी वेगवेगळ्या डिव्हाईसमध्ये व्हॉट्सॲप सुरु केलं, तरी सर्वात आधी असणाऱ्या प्रायमरी फोनमध्येच महत्त्वाच्या प्रक्रिया होती. तसंच हा फोन डिस्ककनेक्ट झाला तर इतरही फोनमधून व्हॉट्सॲप गायब होईल. सर्व चॅट हे एन्ड टू एन्ड इनक्रप्टेड असणार आहेत.
कसं सुरु कराल दुसऱ्या फोनमध्ये व्हॉट्सॲप?
सर्वात आधी ज्या नव्या फोनमध्ये अर्थात सेकंडरी फोनमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप खात सुरु करायचं तो फोन ऑन करुन त्यात व्हॉट्सॲप लॉगिन करा. त्यानंतर प्रायमरी फोनमध्ये लिंक्ड डिव्हाईस असा ऑप्शन आला. त्यात व्हॉट्सॲप सुरु करु शकतो.
वाचा :Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट