50MP कॅमेरा, 8GB रॅम, 5000 mAh बॅटरी, फोनची किंमत फक्त ७४०० रुपये

नवी दिल्लीःटेक्नो स्पार्क १० प्रो आणि टेक्नो स्पार्क १० ५जी लाँच केल्यानंतर आता कंपनीने एन्ट्री लेवल स्मार्टफोन Tecno Spark 10 4G ला लाँच केले आहे. या हँडसेटला मीडियाटेक प्रोसेसरने पॅक्ड करण्यात आले आहे. या फोनला फिलिपिन्स मध्ये लाँच करण्यात आले आहे. टेक्नोच्या या लेटेस्ट स्मार्टफोनची किंमत किती तसेच या फोनमध्ये कोणकोणते फीचर्स दिले आहेत, सविस्तर जाणून घ्या.

Tecno Spark 10 4G चे स्पेसिफिकेशन
टेक्नोच्या या फोनमध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. फ्रंट मध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉचचा फायदा मिळतो. मीडियाटेक हीलियो जी ३७ ऑक्टा कोर प्रोसेसर सोबत IMG PowerVR जीपीयू दिले आहे. ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज या फोनमध्ये दिले आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर दोन कॅमेरे उपलब्ध आहेत. ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एआय लेन्स आणि एलईडी फ्लॅश मिळते. ड्युअल एलईडी फ्लॅश सोबत ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा एक बजेट फोन आहे. या फोनमध्ये १८ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी या फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट दिले आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या साइडला फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. ज्याला पॉवर बटनमध्ये इंटिग्रेट केले आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, ड्युअल सिम आणि जीपीएस आणि ४जी सपोर्ट मिळेल.

वाचाःMaruti Suzuki Fronx ला टक्कर देण्यासाठी तगड्या फीचर्स सोबत येत आहेत दोन नवीन SUV

Tecno Spark 10 4G ची किंमत
या लेटेस्ट बजेट फोनची किंमत ९० डॉलर म्हणजेच जवळपास ७ हजार ४०० रुपये आहे. या हँडसेटला तीन रंगात मेटा ब्लॅक, मेटा व्हाइट, आणि मेटा ब्लू मध्ये आणले आहे.

वाचाः८ लाखांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाली MG Comet EV, टाटा टियागो ईव्हीचे टेन्शन वाढले

वाचाः५२ हजार रुपये देऊन खरेदी करा टाटाची ही सीएनजी कार, मायलेज २६ किमीपर्यंत

Source link

Tecno Spark 10 4GTecno Spark 10 4G featuresTecno Spark 10 4G priceTecno Spark 10 4G saleटेक्नो फोनटेक्नो स्मार्टफोन
Comments (0)
Add Comment