चंद्रग्रहणाची वेळ आणि सूतक काळ
वर्षातील पहिले चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ५ मे २०२३ रोजी होणार आहे. ५ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. म्हणजेच पृथ्वीची सावली केवळ एका बाजूला चंद्रावर असल्याने हे ग्रहण सर्वत्र दिसणार नाही. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, पॅसिफिक अटलांटिक आणि हिंदी महासागरावर दिसणार आहे. चंद्रग्रहण रात्री ८ वाजून ४६ मिनिटापासून सुरू होईल आणि पहाटे १ वाजेपर्यंत चालेल. छायाकल्प चंद्रग्रहणामुळे सुतक कालावधी वैध राहणार नाही.
भारतात दिसणार हे चंद्रग्रहण
भारतात दिसणारे या वर्षातील पहिले आणि शेवटचे चंद्रग्रहण २८ ऑक्टोबरच्या रात्री होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातील अनेक भागांमध्ये पाहता येणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, उत्तर दक्षिण आफ्रिका, आर्क्टिक, अंटार्क्टिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरासह आशियातील अनेक देशात हे दृश्यमान असेल.
चंद्रग्रहणाच्या वेळी स्वयंपाक करणे आणि खाणे या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत. चंद्रग्रहणाच्या वेळी कोणतीही पूजा करू नये. यासोबतच देवघरातही देव झाकून ठेवावे किंवा देवघराचा दरवाजा, पडदा लावावा. चंद्रग्रहण काळात झोपू नये. जास्तीत जास्त देवाचा जप करत राहा. ग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. तसेच, गर्भवती महिलांनी यावेळी चाकू, कात्री वापरणे टाळावे. तसेच, लक्षात ठेवा की या काळात झाडांना स्पर्श करू नये.