AmazonBasics 1.5 Ton, 5 Star, Wi-Fi Enabled Smart AC (किंमत : ३४, ९९० रुपये)
AmazonBasics चा हा 1.5 टन क्षमतेचा AC ट्विन रोटरी इन्व्हर्टर कंप्रेसर आणि व्हेरिएबल कॅपेसिटी टेक्नॉलॉजीसह येतो. दीड टनचा हा एसी १५० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या खोलीसाठी पुरेसा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हा स्प्लिट एसी 5 स्टार रेटिंगसह येत असल्याने वीजेची बचत होऊ शकते. हा AC नोकॉस्ट EMI वर मिळू शकतो. तर Amazon Basics ब्रँडच्या या AC मध्ये १०० टक्के कॉपर कंडेन्सर वापरण्यात आले असून त्यामुळे फास्ट कूलिंग करत असल्याचा दावा केला जात आहे. स्मार्टफोन वापरून वापरकर्ते हा एसी वाय-फायद्वारे नियंत्रित करू शकतात. एसीला ऑटो-रीस्टार्ट, ऑन-ऑफ टायमर, सेल्फ-क्लीन फंक्शन असे फीचर्स मिळतात.
Voltas 1.4 Ton 3 Star Inverter Split AC: (किंमत : ३१, ९९९ रुपये)
एसीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या Voltas कंपनीच्या या AC ची क्षमता 1.4 टन आहे आणि Amazon India वरून नोकॉस्ट EMI वर मिळू शकते. २०२३ मधील या मॉडेलबद्दल बोलायचं झालं तर यात इन्व्हर्टर कॉम्प्रेसर देण्यात आला आहे. व्हेरिएबल स्पीड कंप्रेसरसह, ते उष्णतेच्या लोडनुसार पॉवर अॅडजस्ट करते. चार कूलिंग मोडसह, हा एसी येत असून वेगवेगळ्या टनेजमध्येही अॅडजस्ट केला जाऊ शकतो. ३ स्टार एनर्जी रेटिंग असलेला हा एसी १११ते १५० स्क्वेअर फूट खोली थंड करू शकतो. व्होल्टासच्या या एसीमध्ये कॉपर कंडेन्सर कॉइलचा वापर करण्यात आला आहे. यात अँटी डस्ट, अँटीमाइक्रोबियल प्रोटेक्शन, अँटी-कोरोसिव्ह कोटिंग, एलईडी डिस्प्ले, सेल्फ डायग्नोसिस, स्लीप मोड यासारखे खास फीचर्स आहेत.
Panasonic 1.5 Ton 5 Star Wi-Fi Inverter Smart Split AC (किंमत ४४,९९० रुपये)
या पॅनासोनिक स्प्लिट एसीची क्षमता 1.5 टन आहे. हा एसीही नो-कॉस्ट EMI ऑफरमध्ये उपलब्ध आहे. पॅनासोनिकचा हा स्मार्ट एसी वाय-फाय सपोर्टसह येतो. या 7-इन-1 कन्व्हर्टेबल मोड एसीबद्दल, कंपनीचा दावा आहे की ते १२१ ते १८०स्क्वेअर फुटांपर्यंतच्या खोलीला थंड करू शकते. 5 स्टार रेटिंगसह येत असलेला, हा एसी कॉपर कंडेनसर कॉइलसह येतो. वाय-फाय स्प्लिट एसी ट्विन कूल इन्व्हर्टर कंप्रेसरसह चांगले कूलिंग करु शकतो.
Lloyd 1.5 Ton 3 Star Inverter Split (किंमत ३२,९९९रुपये)
लॉयड कंपनीचा हा दीड टन क्षमतेचा स्प्लिट इन्व्हर्टर एसी Amazon वरून ३२,९९९ रुपयांना घेता येईल. हा एसी देखील नोकॉस्ट EMI वर खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे. हा एसी इन्व्हर्टर कंप्रेसरसह येतो आणि खोलीतील तापमान आणि उष्णतेच्या भारानुसार आपोआप वीज समायोजित करतो. कंपनीचे म्हणणे आहे की हा एसी १६० स्क्वेअर फुटांपर्यंत खोली थंड करू शकतो. 3 स्टार एनर्जी रेटिंग असलेल्या या एसीमध्ये ब्लू फाइंड्स इव्हेपोरेटर कॉइलचा वापर करण्यात आला आहे. क्लीन एअर फिल्टर + पीएम 2.5 एअर फिल्टर, टर्बो कूल, लो गॅस डिटेक्शन, क्लीन फिल्टर इंडिकेशन यासारखी फीचर्स या 5-इन-1 एसीमध्ये उपलब्ध आहेत.
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा