किंमत नेमकी किती?
तर लेटेस्ट Apple iPhone 14 चा 128 GB स्टोरेज वेरियंट सध्या Amazon वर ७१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. परंतु आयफोन 14 Amazon वरून बँक ऑफरसह आणखी सवलतीत घेता येईल. HDFC बँक क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे हँडसेटवर ४००० रुपयांची सवलत मिळेल. याशिवाय, Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड आणि HDFC बँक क्रेडिट कार्डसह iPhone 14 वर नोकॉस्ट EMI ऑफर ही आहे. यासोबत दर तुम्ही एक्सचेंज ऑफरला लाभ घ्याल तर थेट २८,००० तुम्हाला वाचवण्याची संधी आहे.
एक्सचेंजसाठी फोन सुस्थितीत असावा
जर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत नवीन iPhone 14 घ्यायचा असेल तर तुम्हाला जुन्या डिव्हाइसच्या बदल्यात तब्ब २८,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. पण ही एक्सचेंज ऑफर तुमच्या डिव्हाइसची कंडीशन आणि ब्रँडवर अवलंबून असेल. म्हणजेच, जर तुम्ही संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू आणि बँक सवलत मिळवण्यात यशस्वी झालात, तर तुम्हाला iPhone 14 वर एकूण ३२,००० रुपयांची सूट मिळेल.
लेटेस्ट फीचर्ससह येतो iPhoen 14
फीचर्सचा विचार केला तर, iPhone 14 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. तसंच कोणत्याही लाईटमध्ये चांगले फोटो घेण्यासाठी फोनमध्ये अॅडव्हान्स कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. या फोनबाबत कंपनीने दावा केला आहे की याची बॅटरी लाईफ आधीपेक्षा अधिक भारी आहे. याला 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक मिळेल. हँडसेटमध्ये क्रॅश डिटेक्शन कॉल फीचर देण्यात आले आहे. 128 जीबी स्टोरेज व्यतिरिक्त, फोन 512 जीबी आणि 256 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे. iPhone 14 मध्ये Bluetooth, Wi-Fi, USB सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतो. हा फोन iOS ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो आणि ब्लू, मिडनाईट, पर्पल, स्टारलाईट, यलो आणि प्रॉडक्ट रेड या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
वाचा :Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो