सहाव्या दिवशी मरत मरत चालला Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan, १०० कोटींचा तर विचारच सोडा

मुंबई– सलमान खान, पूजा हेगडे स्टारर किसी का भाई किसी की जान च्या बुधवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने निर्माते चिंतेत पडले आहेत. बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवशी किसी का भाई किसी की जानच्या कमाईत कमालीची घट झाली आहे. हा बिग बजेट सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती, पण ईदला प्रदर्शित झालेला भाईजानचा सिनेमा तोंडावर पडेल अशी अवस्था झाली आहे.शर्मिला ठाकरे राजकारणात आल्या तर.. राज ठाकरेंच्या उत्तरांनी साऱ्यांचीच झाली बोलती बंद
सलमान खानचा हा चित्रपट गेल्या शुक्रवारी ईदच्या एक दिवसआधी प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगच्या आकड्यांनीच धक्का दिला होता. कारण ते अपेक्षेपेक्षा फार कमी होते. मात्र प्रदर्शनानंतर सिनेमा थेट कमाई करणार असल्याचे जाणकारांचे मत होते. मात्र, पहिल्या दिवसाचा कमाईचा आकडा सर्व काही सांगून गेला. सिनेमाने पहिल्या दिवशी फक्त १३.७५ कोटींची कमाई केली. सहा दिवसांत चित्रपटाची कमाई ८२ कोटींवर आली असून पहिल्या आठवड्यात चित्रपट ८५ ते ८६ कोटींची कमाई करू शकेल असे बोलले जात आहे. यामुळे पहिल्या आठवड्यात सिनेमा १०० कोटींच्या घरात जाणार नाही हे स्पष्ट आहे.
दिवस कमाई
शुक्रवार १३.७५ कोटी रुपये
शनिवार २४.०० कोटी रुपये
रविवार २४.५० कोटी रुपये
सोमवार ९.५० कोटी रुपये
मंगलवार ६.२५ कोटी रुपये
बुधवार ४.०० कोटी रुपये
एकूण कमाई ८२.०० कोटी रुपये

ईदनंतरही या चित्रपटाने महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली असली तरी आता सिनेमा संघर्ष करताना दिसत आहे. दिल्ली/यूपी इथे सलमानचे सिनेमे सर्वात जास्त कमाई करताना दिसतात, पण यावेळी तसं काही झालं नाही. सिनेमाच्या, कमाईची तुलना चित्रपटाच्या बजेटशी केली तर भारतापेक्षा परदेशात सिनेमाने बरी कामगिरी केली आहे. चित्रपटाचं बजेट जवळपास १५० कोटी रुपये आहे आणि पाच दिवसात चित्रपटाने जगभरात १३३ कोटींची कमाई केली आहे.

लता दीदीकडून मिळालेली भेट मात्र विद्या बालनच्या मनात सलतेय खंत

Source link

Kisi Ka Bhai Kisi Ki JaanKisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collectionsalman khansalman khan agesalman khan news
Comments (0)
Add Comment